शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'अम्मा'चा आशीर्वाद... रजनीकांत, कमल हसननंतर आता शशिकलांच्या भाच्याचाही राजकीय पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 11:18 IST

टीटीव्ही दिनकरन यांनी गेल्याच महिन्यात जयललिता यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या आर.के.नगर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता.

मदुराई: शशिकला यांचे भाचे आणि अण्णाद्रमुक पक्षाचे माजी नेते टीटीव्ही दिनकरन यांनी गुरूवारी नव्या पक्षाची घोषणा केली. मदुराई येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. अम्मा मक्कल मुनेत्र कझागम (एएमएमके) असे दिनकरन यांच्या नव्या पक्षाचे नाव आहे. कुकर हे त्यांच्या पक्षाचे चिन्ह आहे. आम्ही नव्या पक्षाच्या नावाने आगामी सर्व निवडणुका लढवू आणि त्यामध्ये विजय प्राप्त करू. तसेच आम्ही निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आलेल्या दोन पानांचे चिन्ह परत मिळावे, यासाठीही प्रयत्न करत आहोत. तोपर्यंत कुकर हेच आपल्या नव्या पक्षाचे चिन्ह असेल, असे दिनकरन यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. टीटीव्ही दिनकरन यांनी गेल्याच महिन्यात जयललिता यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या आर.के.नगर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच दिनकरन यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेते रजनीकांत आणि कमल हसन यांच्या पक्षांचा प्रवेश झाला होता. त्यानंतर आता टीटीव्ही दिनकरन यांच्या नव्या पक्षामुळे तामिळनाडूतील राजकीय परिस्थिती आणखी रंजक झाली आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात. जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूत सातत्याने राजकीय उलथापालथी सुरू आहेत. मध्यंतरी अण्णाद्रमुकमधील के.पलानीस्वामी आणि ओ.पनीरसेल्वम यांच्या गटाने हातमिळवणी केली होती. त्यामुळे तामिळनाडूचे राजकारण सातत्याने दोलायमान राहिले आहे. 

 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूPoliticsराजकारण