शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अतूट प्रेम! पतीच्या मृत्यूनंतर काही क्षणात पत्नीनेही सोडला जीव; एकाच चितेवर दोघांना मुखाग्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 18:40 IST

एका जोडप्याने आयुष्यभर एकमेकांना साथ दिली आणि आता सोबतच शेवटचा श्वास घेतला असल्याची घटना घडली आहे.

प्रेमात अनेकजण एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतात. पण फार कमी लोक ते शेवटपर्यंत निभावू शकतात. अशीच एक हृदयस्पर्शी घटना आता समोर आली आहे. एका जोडप्याने आयुष्यभर एकमेकांना साथ दिली आणि आता सोबतच शेवटचा श्वास घेतला असल्याची घटना घडली आहे. पतीच्या मृत्यूनंतर काही क्षणात पत्नीनेही जीव सोडला. त्यामुळे एकाच चितेवर दोघांना मुखाग्नी देण्यात आला आहे. 

ग्वाल्हेरच्या रमेश खाटिक आणि चतरो देवी यांची ही गोष्ट आहे. 70 वर्षीय रमेश खाटिक यांचे निधन झाले. हे पाहून काही क्षणातच त्यांची पत्नी चतरो देवी यांचाही मृत्यू झाला. पती-पत्नी दोघेही ५० वर्षे सावलीसारखे एकमेकांसोबत राहिले आणि दोघांचा मृत्यूही एकाचवेळी आला. दोघांचा शेवटचा प्रवास एकाच दिवशी झाला आणि दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. 

भितरवार येथील चिटोली येथे राहणारे रमेश चंद्र खाटिक (७०) यांनी रात्री ६८ वर्षीय पत्नी चतरो देवीसोबत जेवण केलं. जेवण करून दोघेही झोपी गेले. रात्री रमेशचंद्र बाथरूमला जाण्यासाठी उठले. यादरम्यान ते अचानक खाली पडले आणि मृत्यू झाला. काही वेळाने पत्नी चतरोबाई यांना जाग आली असता त्यांनी पती मृतावस्थेत असल्याचे पाहिले. ते पाहून त्यांचाही मृत्यू झाला. सकाळी घरच्यांना जाग आली तेव्हा हे समोर आलं. कुटुंबीयांनी डॉक्टरांना फोन केला असता दोघांचा मृत्यू झाला होता.

रमेश चंद्र आणि चतरो देवी यांचा विवाह ५० वर्षांपूर्वी झाला होता आणि जेव्हा जगाचा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा दोघेही एकत्र निघून गेले. सात फेरे घेत असताना एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ खर्‍या अर्थाने चतरो देवी यांनी पूर्ण केली, असेही लोकांनी सांगितले. स्मशानभूमीत एकाच चितेवर दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. रमेश चंद्र खाटिक आपल्या गावात रमेश नेताजी म्हणून प्रसिद्ध होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"