शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

ट्रकचालकांच्या संपाचा १० राज्यांना बसला फटका, १५ लाख ट्रकची चाके थांबली; फळे, भाजीपाला महागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 07:02 IST

Truck drivers protest : संपामुळे अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेल, फळे-भाज्या आणि इतर जीवनावश्यक वस्तू पोहोचू शकल्या नाहीत. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नवीन ‘हिट अँड रन’ कायद्याच्या (hit-and-run law) विरोधात ट्रक, डंपर आणि बसचालकांचा संप मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिला. जवळपास १५ लाख ट्रकची चाके थांबल्याचे सांगण्यात येत आहे. इंधन मिळाले नाही तर काय, या भीतीपोटी वाहनचालकांनी पेट्रोल पंपाबाहेर लांबच लांब रांगा लावल्या. राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, हरयाणा, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, पंजाब आणि उत्तराखंड आदी दहा राज्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक राज्यांत ट्रकचालकांच्या आंदोलनांनी तणाव निर्माण झाला.  संपामुळे अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेल, फळे-भाज्या आणि इतर जीवनावश्यक वस्तू पोहोचू शकल्या नाहीत. 

जम्मू-काश्मीर, पंजाबमध्ये रांगापुरवठा विस्कळीत झाल्याने पंजाब आणि जम्मू आणि काश्मीरमधील इंधन केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्या होत्या आणि लोक इंधन मिळाले नाही तर काय या भीतीपोटी खरेदी करत होते. श्रीनगरच्या काही भागात आणि खोऱ्यातील इतरत्र वाहतूककोंडी झाली. हैदराबादमधील काही पंप वगळता कोणताही मोठा पुरवठा खंडित न झाल्याने दक्षिण भारतातील परिस्थिती चांगली होती.

ट्रकचालकांची पोलिसांशी झटापटउत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये ट्रकचालकांची पोलिसांशी झटापट झाली. चालकांना हटवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. बिहारच्या हाजीपूर, राजस्थानच्या अजमेर आणि मध्य प्रदेशातील खरगोनमध्येही पोलिस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. 

काँग्रेसचा संपाला पाठिंबाकाँग्रेसने ट्रकचालकांच्या संपाला पाठिंबा जाहीर केला असून या कायद्याच्या गैरवापरामुळे खंडणीखोरांचे जाळे निर्माण होऊन संघटित भ्रष्टाचार होऊ शकतो, असा आरोप केला. 

राजस्थानमध्ये सोमवारी रात्री काही ठिकाणी हिंसाचार झाला. जमावाने पोलिसांचे वाहन जाळले आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. केकरी जिल्ह्यात तीन जखमी झाले.  

जिल्हाधिकारी म्हणाले, तुमची औकात काय?nशाजापूर येथील संघटनेने आंदोलन करत महामार्ग रोखून धरल्याने जिल्हाधिकारी किशोर कन्याल यांनी वाहनचालकांची बैठक आयोजित केली होती. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, कोणीही कायदा हातात घेणार नाही. त्यावर एक ड्रायव्हर  म्हणाला, चांगले बोला. nत्यामुळे जिल्हाधिकारी संतापून म्हणाले की, तुम्ही स्वत:ला काय समजता?, काम करणार तुम्ही?, तुमची औकात काय?, त्यावर ड्रायव्हर म्हणाला की, आमची औकात नाही, हीच आमची लढाई आहे. याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

टॅग्स :agitationआंदोलनPetrolपेट्रोल