शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

एका रात्रीत नशीब पालटलं! ट्रक ड्रायव्हरनं जिंकली १० कोटींची लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 12:18 IST

Punjab 10 Crore Lottery Winner : कुवेतमध्ये ट्राक ड्रायव्हर म्हणून काम करणारे हरपिंदर सिंग यांनी रविवारी १० कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. 

Punjab 10 Crore Lottery Winner : कुणाचे नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार पंजाबमधील हरपिंदर सिंग यांच्या बाबतीत घडला आहे. हरपिंदर सिंग यांचे नशीब एका रात्रीत पालटले आहे.  मुळचे पंजाबमधील रोपार येथील बारवा गावातील रहिवासी आणि कुवेतमध्ये ट्राक ड्रायव्हर म्हणून काम करणारे हरपिंदर सिंग यांनी रविवारी १० कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. 

आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी गावी परतलेल्या हरपिंदर सिंग यांनी पंजाबमधील रोपार जिल्ह्यातील नुरपूर बेदी शहरातील अशोका लॉटरीमधून तिकीट खरेदी केले होते आणि ते विजेता ठरले. याबाबत हरपिंदर सिंग म्हणाले की, "मी नियमितपणे लॉटरीची तिकिटे खरेदी करायचो. यावेळी, मी लोहरी मकर संक्रांतीचे बंपर तिकीट खरेदी केले. त्यानंतर मला अशोका लॉटरीचा फोन आला की, मी लॉटरी जिंकलो आहे."

राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी १० कोटी रुपयांची लॉटरी हरपिंदर सिंग यांनी जिंकली. अशोका लॉटरीचे मालक हेमंत कक्कर यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, आपल्या एका खरेदीदाराने बक्षीस जिंकले याचा मला आनंद आहे. तर हरपिंदर सिंग यांनी लॉटरी जिंकल्यानंतर आपल्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केल्याचे आणि बराच काळ ट्रक चालवत असल्याचे सांगत गरजूंना मदत करण्याचा आणि आपल्या कुटुंबाला आधार देण्याचा प्लॅन करण्यास सुरुवात केल्याचे म्हटले आहे.

बक्षीस जिंकल्यानंतर हरपिंदर सिंग यांनी सांगितले की, "मला कर्ज फेडायचे आहे. मात्र, सुरूवातीला मला माझ्या नशिबावर विश्वास बसत नव्हता. मी कुवेतला जाण्यासाठी खूप पैसे खर्च केले आहेत. तसेच, माझा मुलगा देविंदर सिंग याला काही वर्षांपूर्वी एका अपघातात डावा हात गमवावा लागला. हा आमच्या सर्वांसाठी खूप मोठा धक्का होता. आता मला आशा आहे की, मी त्याला चांगले उपचार मिळवून देऊ शकेन आणि त्याच्याकडे उत्पन्नाचे एक स्थिर स्रोत असेल, याची खात्री करू शकेन."

सब-स्टॉकिस्टला ५ लाख रुपये मिळतीलपंजाब राज्य लॉटरी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की, बक्षिसाच्या रकमेपैकी ३० टक्के रक्कम मूळ रकमेवर कर म्हणून कापली जाईल. अतिरिक्त आयकर देणी देखील असतील. या विजयामुळे विक्रेता हेमंत कक्कर यांनाही मोठा फायदा झाला आहे, ज्यांना जवळपास २५ लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे. तर सब-स्टॉकिस्टला ५ लाख रुपये मिळतील. याशिवाय, अधिकाऱ्यांच्या मते, विक्रेता हेमंत कक्कर यांची "विश्वसनीय" तिकीट विक्रेता म्हणून ओळख देखील मजबूत झाली आहे.

टॅग्स :Punjabपंजाब