शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

तेलंगणात टीआरएसला काँग्रेस-टीडीपीच्या आघाडीचे आव्हान, भाजपाला मिळेल शेवटचं स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 06:30 IST

शेतकऱ्यांच्या समस्या, शिक्षण, बेरोजगारी हे मुद्दे गाजणार

हैदराबाद : के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) गेल्यावेळी स्वतंत्र राज्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आणि त्यांना यश मिळाले. आता मात्र तशी परिस्थिती नाही. येत्या ७ डिसेंबरला होणाºया निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीसमोर अनेक आव्हाने आहेत.

यंदा काँग्रेस, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम (टीडीपी), सीपीआय व तेलंगणा जन समिती (टीजेएस) यांची आघाडी आहे. त्यामुळे केसीआर यांच्यापुढे या आघाडीचे आव्हान असेल. तेलंगणात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे हाही मुद्दा निवडणुकीत गाजेल. शिक्षणासंदर्भात केसीआर सरकारने कोणतीच पावले उचलली नाहीत, असा विरोधकांचा आरोप आहे. शिक्षण व्यवस्थेत १०० दिवसांत मूलभूत बदल करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते. पण काँग्रेसनेही आश्वासने पाळली नसल्याची जनतेची भावना आहे. साडेतीन कोटी लोकसंख्येपैकी ८६ लाख लोक अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आहेत. हे मतदार पूर्वापार काँग्रेसला मदत करत आले आहेत. या निवडणुकीत ते कुणासोबत राहतात, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. दलित, मुस्लिम व आदिवासींची मते निर्णायक मानली जातात.

तेलंगणात स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यावर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. याआधी २०१४ मध्ये ११९ पैकी ६३ जागा केसीआर यांच्या टीआरएसला मिळाल्या होत्या. ती निवडणूक स्वतंत्र राज्याच्या मुद्द्यावरच लढवली होती. सत्तेत आल्यावर केसीआर यांनी शेतकºयांसाठी, मिशन काकतिया, कल्याणलक्ष्मी व शादी मुबारक योजना आणल्या. त्याआधारे जनतेकडे मते मागितली जातील.२०१४ मध्ये कसे होते पक्षीय बलाबलविधानसभेत ३० एप्रिल २०१४ रोजी झालेल्या निवडणुकीत टीआरएस व इतर९०, काँग्रेस १३, एमआयएम ७, भाजपा, ५, टीडीपी ३, सीपीआय १ असे पक्षीय बलाबल होते. तेलंगणामध्ये ३१ जिल्हे असून, ११९ जागांसाठी निवडणूक होणार आहे.टीआरएसला पसंती : टीम फ्लॅश व व्हीडीएस असोसिएटस् यांच्या सर्वेक्षणात टीआरएसला ११७ पैकी ८५, काँग्रेसला १८, एमआयएमला ७ आणि भाजपाला ५ जागा मिळतील असा अंदाज आहे.

टॅग्स :TelanganaतेलंगणाBJPभाजपाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक