शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत पैसे वाटल्याप्रकरणी खासदाराला तुरुंगवासाची शिक्षा, देशातील पहिलीच घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 13:15 IST

MP maloth kavitha jailed : तेलंगाणा राष्ट्र समितीच्या खासदार मलोत कविता यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पैसे वाटल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.

ठळक मुद्दे मलोत कविता यांना कोर्टाने सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

हैदराबाद: निवडणुकीदरम्यान नेत्यांवर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप अनेकदा होत असतो. पण, पैसे वाटल्याप्रकरणी खासदारला शिक्षा झाल्याचे पहिलेच प्रकरण हैदराबादमध्ये घडले आहे. मतदारांना पैसे दिल्याप्रकरणी तेलंगाणातील महबूबाबादच्या आणि तेलंगाणा राष्ट्रीय समिती (TRS) च्या खासदार मलोत कविता (Maloth Kavitha) यांना नामपल्लीमधील एका विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. 

मलोत कविता यांना 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान पैसे दिल्याच्या प्रकरणता दोषी ठरवले आहे. कोर्टाने त्यांना दहा हजार रुपये दंढ आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पण, त्यांना हायकोर्टात अपील करण्यासाठी परवानगी असेल. आता लवकरच मलोत कविता हाय कोर्टात अपील करू शकतात.

असा झाला खुलासाही घटना तेव्हा समोर आली, जेव्हा 2019 मध्ये महसुल अधिकाऱ्यांनी मलोत कविता यांचा सहकारी शौकत अलीला पैसे वाटताना रंगेहात पकडले होते. शौकत अली बर्गमपहाड परिसरातील मतदारांना एका मतासाठी 500 रुपये देत होते. यानंतर पोलिसांनी आधी शौकत अलीवर आणि त्यानंतर मलोत कविता यांच्यावर मतदारांना पैसे दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

कोर्टात पुरावे सादरपोलिसांनी सुनावणीदरम्यान फ्लाइंग स्काव्डच्या अधिकारी आणि त्यांच्या रिपोर्टला पुरावा म्हणून सादर केले. चौकशीदरम्यान शौकत अलीने आरोप मान्य करत कविता यांच्या सांगण्यावरुन पैसे वाटल्याचे कबुल केले. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाTelangana Lok Sabha Election 2019तेलंगाना लोकसभा निवडणूक निकाल 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९