शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादमध्ये टीआरएस सर्वात माेठा पक्ष; महापालिकेत त्रिशंकू स्थिती, MIM च्या हाती सत्तेची चावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 07:40 IST

भाजपची ४८ जागांपर्यंत झेप; एनडीएमधला जुना मित्रपक्ष तेलगू देसम पार्टीला या निवडणुकीत भाेपळा मिळाला आहे. ती जागा भाजपने भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे.

हैदराबाद : महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीला बहुमतापासून वंचित राहावे लागले असले तरीही एमआयएमच्या पाठिंब्याने सत्ता स्थापनेचा मार्ग माेकळा आहे. हैदराबादचे भाग्यनगर करण्याच्या इराद्याने निवडणूक लढविणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून वंचित राहावे लागले तरीही चार वरून ४८ जागांपर्यंत झेप मारली आहे. टीआरएसला ५५ जागा मिळाल्या आहेत. 

महापालिकेच्या १५० जागांसाठी ४६.६ टक्के मतदान झाले हाेते. भाजपने ही निवडणूक खूप प्रतिष्ठेची केली हाेती. गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचार केला. याेगी आदित्यनाथ यांनी हैदराबादचे ‘भाग्यनगर’ करण्याचे विधान करुन मतदारांना साद घातली हाेती. तर अमित शहा यांनी जंगी राेड शाे करुन हैदराबादमधील निझामशाही संपवाची आहे, असे वक्तव्य करुन ओवैसी आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर टीका केली हाेती.  टी.आर.एस. एका जागेवर मतमोजणीत आघाडीवर असला तरी न्यायालयाच्या आदेशावरून मतमोजणीला स्थगिती देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र माेदीही लस पाहणीच्या निमित्ताने याच काळात हैदराबादमध्ये गेले हाेते. याचा पक्षाच्या कामगिरीवर निश्चतच परिणाम झाला असून चार वरून ४८ जागांपर्यंत मजल मारता आली आहे. एनडीएमधला जुना मित्रपक्ष तेलगू देसम पार्टीला या निवडणुकीत भाेपळा मिळाला आहे. ती जागा भाजपने भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे.

सत्ताधाऱ्यांना झटकाटीआरएसला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. प्रचारामध्ये स्थानिक प्रश्न मांडले नाही. तसेच काही वर्षांमधील कामगिरी मतदारांची नाराजी ओढावणारी ठरली. तसेच एमआयएमसाेबतच्या छुप्या युतीवरुनही टीआरएसवर टीका झाली. तरीही याच छुप्या युतीच्या जाेरावर सत्तास्थापनेचा मार्ग माेकळा हाेऊ शकताे.भाजपला ‘नाे एन्ट्री’ : असदुद्दीन ओवैसींच्या पक्षाला यंदा ४३ जागा मिळाल्या. परंतु, ओवैसींच्या गडात कमळाला प्रवेश मिळाला नाही काँग्रेसच्याही पदरात पूर्वीप्रमाणेच दाेन जागा आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन