बाजारभावाअभावी शेतकरी अडचणीत
By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST
निरगुडसर : शेती आणि शेतीपूरक व्यवसाय यांना मिळणारा बाजारभाव यामुळे बळीराजा यंदाच्या वर्षी पूर्ण अडचणीत सापडला आहे.
बाजारभावाअभावी शेतकरी अडचणीत
निरगुडसर : शेती आणि शेतीपूरक व्यवसाय यांना मिळणारा बाजारभाव यामुळे बळीराजा यंदाच्या वर्षी पूर्ण अडचणीत सापडला आहे.वारंवार होणार्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतमालाचे होणारे नुकसान, ऊसदराबाबत झालेली निराशा, दुग्धव्यवसायास न मिळणार्या बाजारभावामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़ भावाअभावी साधारणपणे साडेतीन ते चार किलो वजनाचे पक्षी शेडमध्ये विक्रीअभावी पडून आहेत़पोल्ट्री व्यावसायिकांना कोंबड्यांचे संगोपन करणे न परवडणारे झाले आहे़ साधारणपणे एक महिन्यापूर्वी ओपन मार्केटमधून २५ ते ३० रुपये दराने कोंबडीचे पिल्लू चिक्स खरेदी केले जात होते़ एका पिलाच्या संगोपनासाठी खाद्य,औषधेे चिक्स, मजुरी व लाईट, असा एकूण ६० ते ६५ रुपये एक किलोसाठी खर्च होतो. बाजारात याच कोंबडीला ट्रेडर्स व्यापारी अवघ्या ४५ ते ५० रुपये किलोने विकत घेत आहे़ त्यामुळे बॉयलर कोंबडी संगोपनाचा उत्पादनाचा खर्च आणि सद्यस्थितीत मिळणारा बाजारभाव यामध्ये १५ ते २० रुपयांची तफावत आहे़ यामुळे पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले असून, गेल्या दोन वर्षांतील हा प्रथमच नीचांकी भाव असल्याचे पोल्ट्री व्यावसायिक ग्रामपंचायत सदस्या ज्योती लाड यांनी सांगितले़ सर्वांत विशेष बाब म्हणजे या ठरणार्या दरावर कुठलेही शासकीय नियंत्रण नसून ट्रेडर्सकडूनच हा बाजारभाव निश्चित होतो़ मात्र, कोसळलेल्या बाजारभावाचा विचार करता, किरकोळ चिकन विकणार्या दुकानदारांनी ग्राहकांकडून फ ारशी अपेक्षा न ठेवता १२० ते १४० ऐवजी ८०ते ९० रुपये किलोने चिकन विकले पाहिजे, असे ग्राहकांचे मत आहे़़़़़छायाचित्राखालील मजकुर-निरगुडसर (ता़ आंबेगाव) येथील पोल्ट्री शेडवरील बॅ्रायलर पक्षी बाजारभाव कमी असल्यामुळे विक्रीअभावी पडून आहेत़