छोटा राजनच्या अडचणीत वाढ मकोकांतर्गत दोन नवे गुन्हे दाखल
By admin | Updated: April 18, 2016 00:47 IST
नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या अडचणी वाढल्या आहेत. सीबीआयने रविवारी मकोकांतर्गत हत्येचा प्रयत्न आणि खंडणीच्या संदर्भात छोटा राजनविरुद्ध आणखी दोन नवे गुन्हे दाखल केले.
छोटा राजनच्या अडचणीत वाढ मकोकांतर्गत दोन नवे गुन्हे दाखल
नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या अडचणी वाढल्या आहेत. सीबीआयने रविवारी मकोकांतर्गत हत्येचा प्रयत्न आणि खंडणीच्या संदर्भात छोटा राजनविरुद्ध आणखी दोन नवे गुन्हे दाखल केले.२०१३ मध्ये ५५ वर्षीय छोटा राजनच्या टोळीने बिल्डर अजय गोसालिया आणि अर्शद शेख या दोघांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप असून, त्याचा तपास सीबीआयने आपल्या हाती घेतला आहे, अशी माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली. मुंबईच्या मालाड येथील एका मॉलबाहेर दोन शूटर्सनी गोसालियावर गोळीबार केला होता, ज्यात तो गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी अनेक लोकांना अटक केली होती आणि या हल्ल्यामागे छोटा राजनच्याच टोळीचा हात असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते.दुसरे प्रकरण नीलेश या व्यक्तीला २० लाख रुपयांची खंडणी मागितल्याबाबत आहे. छोटा राजन टोळीचे सदस्य आणि त्याचा शूटर भारत नेपाळी याने ही खंडणी मागितली होती. आपल्याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर आपण हे २० लाख रुपये देण्यास तयार झालो होतो, असे नीलेशने सांगितले होते. (वृत्तसंस्था)