शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

त्रिपुरा निवडणूक- भाजपाला मत दिल्याने सासरच्यांनी सुनेची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 15:18 IST

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत सीपीएमऐवजी भाजपाला मत दिल्याने सासरच्यांनी सुनेची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अगरतला- त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत सीपीएमऐवजी भाजपाला मत दिल्याने सासरच्यांनी सुनेची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सीपीएमऐवजी भाजपला मत का दिलं? असा जाब विचारत सासरच्या लोकांनी सूनेची हत्या केली. महिलेला तिच्या सासऱ्याने आणि दीराने विटा व काठ्यांनी मारहाण करत तिची हत्या केली, अशी महिती महिलेच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली आहे. पीडित महिला 32 वर्षीय होती.

18 फेब्रुवारी रोजी त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत एका आदिवासी महिलेने सासरच्या लोकांच्या विरोधात जाऊन भाजपाला मत दिलं. भाजपाला मत दिल्याची माहिती मिळताच पीडित महिलेचे सासरे, दीर व अन्य एकाने घरात घुसून महिलेला मारहाण केली. शेजारी लोकांनी महिलेला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. पण, मारहाण करून हे दोघेही तेथून फरार झाले. मारहाण झाल्याची माहिती मिळताच पीडित महिलेच्या पतीने तीन जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पण या प्रकरणी कुणाला अटक करण्यात आली नाही. 

त्रिपुरा विधानसभेच्या 59 जागांसाठी 18 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. यावेळी सीपीएमची सत्ता संपुष्टात आणण्याचा दावा भाजपाने केला आहे. तर माणिक सरकारच्या नेतृत्त्वात सीपीएमही आपलं सरकार विचविण्याचा दावा करत आहे. 3 मार्च रोजी त्रिपुरा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल.