शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या व्यूहरचनेची राज्यसभेत कठीण परीक्षा, ‘ट्रिपल तलाक’चे विधेयक बुधवारी मांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 02:38 IST

ट्रिपल तलाकचे विधेयक राज्यसभेत सादर केले जाईल त्यावेळी नरेंद्र मोदी सरकारच्या बाजुने बहुमत नाही. त्याला राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) नसलेल्या अखिल भारतीय अण्णा द्रमुक व द्रमुकसारख्या पक्षांसह अवघ्या १०८ सदस्यांचा पाठिंबा आहे. राज्यसभेत विधेयक तीन जानेवारी रोजी मांडले जाईल.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : ट्रिपल तलाकचे विधेयक राज्यसभेत सादर केले जाईल त्यावेळी नरेंद्र मोदी सरकारच्या बाजुने बहुमत नाही. त्याला राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) नसलेल्या अखिल भारतीय अण्णा द्रमुक व द्रमुकसारख्या पक्षांसह अवघ्या १०८ सदस्यांचा पाठिंबा आहे. राज्यसभेत विधेयक तीन जानेवारी रोजी मांडले जाईल.२३८ सदस्यांच्या राज्यसभेत मोदी सरकार बहुमतापासून दूरच आहे. लोकसभेतील बहुतेक विरोधी पक्षांना हे विधेयक निवड समितीकडे पाठवून ते ‘अधिक चांगले’ केले जावे असे वाटते. त्यांनी लोकसभेत त्याला विरोध केलेला नाही. या पक्षांना आपल्या दृष्टिकोनाचा राज्यसभेत योग्य तो सन्मान राखला जावा, असे वाटते.या पक्षांचा युक्तिवाद असा आहे की विधेयक निवड समितीकडे पाठवल्यास काही आभाळ कोसळणार नाही व ते ३० जानेवारीपासून सुरू होणाºया अर्थसंकल्पीय अधिवेशनातही संमत होऊ शकते. परंतु मोदी सरकार राज्यसभेतील विरोधकांच्या विधेयक निवड समितीकडे पाठवण्याच्या दडपणाला बळी पडण्याची शक्यता नाही. राजकीय परिणाम काहीही होवा पंतप्रधान मोदी यांनी तीन वेळा तलाक विधेयक संमत करून घ्यायचा शब्द दिला आहे.अतिशय उच्च पातळीवरील सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार हे विधेयक राज्यसभेत तीन जानेवारी रोजी सादर केले जाईल आणि राजकीय परिणामांची काळजी न करता ते त्याच दिवशी संमत करण्याचा आग्रह सरकार धरेल.भाजपमधील सूत्रांवर विश्वास ठेवला तर भाजप या विधेयकाच्या मुद्यावर संघर्षासाठी उत्सुक असून मतदानासाठी विधेयक सभागृहात सादर केले जाईल त्यावेळी विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षासारखेच वागतील, असे वाटते.पंतप्रधान मोदी यांनी पक्ष नेत्यांना ते तत्वांबद्दल तडजोड करणार नाहीत एवढेच काय विधेयकाचा पराभव होऊन राज्यसभेतील हानीही सोसण्याची जोखीम घ्यायला तयार आहेत, असे स्पष्ट केले आहे.मुस्लिम महिलांच्याहक्कांना विरोध करणारे पक्षअसे आपल्याबद्दल म्हटलेलेविरोधी पक्षांना वाटणार नाही, अशी मोदींना खात्री वाटते.पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या २७ टक्के आहे.त्यामुळे मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या खासदारांना लोकसभेत विधेयकाला विरोध करू नका, असे आदेश दिले होते.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकIndiaभारतGovernmentसरकार