नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे एक खासदार लोकसभेत गेल्या काही दिवसांपासून ई-सिगारेट ओढत असल्याचा आरोप भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी केला. तृणमूलच्या खासदाराने संसदेची प्रतिष्ठा कमी करण्याचा नवा विक्रम केला असल्याची टीका करत त्या खासदारावर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.
लोकसभेत ई सिगारेट ओढणाऱ्या खासदारावर तृणमूल काँग्रेस कारवाई करणार की लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कारवाई करेपर्यंत वाट पाहणार, असा सवाल भाजपने केला. मात्र, या खासदाराचे नाव भाजपने उघड केले नाही.
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
लेखी तक्रार आल्यास अवश्य कारवाई करणार : बिर्ला
देशात बंदी असलेली ई-सिगारेट लोकसभेत ओढण्यास परवानगी आहे का, अशी विचारणा लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला अनुराग ठाकूर यांनी केली होती.
तृणमूल काँग्रेसचे एक खासदार गेल्या काही दिवसांपासून लोकसभेत सातत्याने धूम्रपान करत आहेत, अशी माहिती त्यांनी त्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिली. याप्रकरणी लेखी तक्रार आल्यास अवश्य कारवाई करण्यात येईल, असे बिर्ला यांनी सांगितले.
तृणमूल काँग्रेस खासदारावर कारवाई करणार का?
भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला म्हणाले, तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने आपल्या वर्तनाने संसदेची प्रतिष्ठा कमी करण्याचा नवा विक्रम केला आहे. हा पक्ष स्वतःला संविधानाचा रक्षक म्हणवतो.
इतकी मोठी गोष्ट उघडकीस आल्यानंतर तृणमूल काँग्रेस आपल्या खासदारावर कारवाई करेल का? असा प्रश्न पुनावाला यांनी विचारला आहे. तृणमूल काँग्रेसने याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
Web Summary : BJP alleges Trinamool MP smoked e-cigarette in Lok Sabha, disrespecting parliament. BJP demands action; Speaker awaits written complaint. Trinamool's response awaited.
Web Summary : भाजपा का आरोप है कि तृणमूल सांसद ने लोकसभा में ई-सिगरेट पीकर संसद का अपमान किया। भाजपा ने कार्रवाई की मांग की; स्पीकर को लिखित शिकायत का इंतजार है। तृणमूल की प्रतिक्रिया का इंतजार है।