शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तृणमूल नेत्यांना आसामात रोखले, मारहाणीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 05:28 IST

‘नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स’च्या अंतिम मसुद्याच्या प्रसिद्धीनंतर आसाममध्ये उद््भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या खासदार-आमदारांच्या आसाम भेटीवरून तृणमूल व भाजपामध्ये गुरुवारी खडाजंगी झाली.

नवी दिल्ली : ‘नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स’च्या अंतिम मसुद्याच्या प्रसिद्धीनंतर आसाममध्ये उद््भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या खासदार-आमदारांच्या आसाम भेटीवरून तृणमूल व भाजपामध्ये गुरुवारी खडाजंगी झाली. आमच्या शिष्टमंडळास सिलचर विमानतळावरच अडवून पोलिसांनी धक्काबुक्की, मारहाण केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला.आसाममध्ये त्यांनी जाण्याचे काही कारणच नाही, असे म्हणून भाजपाने त्यांना तत्काळ हाकलून देण्याची भाषा केली. या खासदार-आमदारांसोबत पोलिसांच्या झालेल्या झटापटीचे चित्रण स्थानिक वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आले.तृणमूलचे सहा खासदार व दोन आमदारांचे शिष्टमंडळ दुपारी सिलचर येथे पोहोचले. तेथील नागरिक सम्मेलनात सहभागी होऊन नंतर नागांव व गुवाहाटीलाही जाण्याचा त्यांचा कार्यक्रम होता. सुखेंदू शेखर राय, काकोली घोष दस्तीदार, रत्ना डे नाग, नदिमूल हक, अर्पिता घोष व ममताबाला ठाकूर या खासदारांखेरीज प. बंगालचे नगरविकासमंत्री फिरहाद हकीम व आमदार महुआ मोईत्रा शिष्टमंडळात होते. पण सिलचर विमानतळावरच जिल्हा दंडाधिकारी व पोलिसांनी आम्हाला अडविले. एका पोलिसाने माझ्या छातीवर ठोसा मारला. काकोली दस्तीदार, ममताबाला ठाकूर व महुआ मोईत्रा यांनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली, असा आरोप सुखेदू राय यांनी केला. ते हृदयरुग्ण आहेत.खा. घोष दस्तीदार म्हणाले की, पोलिसांनी आमचे मोबाइलही हिसकावून घेतले. ममताबाला व महुआ यांच्याप्रमाणे मलाही धक्काबुक्की केली व सुखेंंदू यांना मारहाण केली. आम्हाला बाहेर जाऊ देईपर्यंत आम्ही येथेच बसून राहू, असे खा. राय म्हणाले. खा. दस्तीदार म्हणाले की, विमानतळावर एक मॅजिस्ट्रेटही होता. शिष्टमंडळ सदस्य म्हणाले की, पुढे काय करायचे हे पक्ष नेतृत्वाशी बोलून ठरवू. संसदेतही हक्कभंग आणण्याची तयारी सुरू आहे. हे शिष्टमंडळ आसाममध्ये तणाव निर्माण करण्यासाठी गेल्याने त्यांना रोखणे योग्यच आहे, असे प. बंगाल प्रदेश भाजपाचे अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले. त्यांना तेथे जाण्याचे कारणच काय?, असा सवालही त्यांनी केला. भाजपाचे चिटणीस राहुल सिन्हा म्हणाले की, त्यांना आसामधून सक्तीने बाहेर काढायला हवे.

टॅग्स :AssamआसामMamata Banerjeeममता बॅनर्जी