बॉलर्सची केली ‘कचराकुंडी’.. म्हणूनच सेहवाग आहे ‘वाघ’!

By admin | Published: June 7, 2017 03:26 PM2017-06-07T15:26:58+5:302017-06-07T15:26:58+5:30

सामन्याच्या पहिल्याच बॉलला जास्तीत जास्त वेळा फोर मारणारा जगातला सर्वोत्तम ‘तडाकू’ बॅट्समन

'Trichakundi' made by the bowler, therefore, Sehwag is 'Wagh'! | बॉलर्सची केली ‘कचराकुंडी’.. म्हणूनच सेहवाग आहे ‘वाघ’!

बॉलर्सची केली ‘कचराकुंडी’.. म्हणूनच सेहवाग आहे ‘वाघ’!

Next

- मयूर पठाडे

विरेंद्र सेहवाग. मैदानावर असो, की मैदानाबाहेर, तो कायमच जोरदार ‘बॅटिंग’ करत असतो आणि एकेकाला उचलून सीमापार पाठवत असतो.
प्रत्यक्ष मैदानावर तर त्यानं अनेकांची धू धू धुलाई केलीच, पण मैदानाबाहेरही त्याचा तोच उद्योग आताही सुरू आहे. सोशल मिडियाच्या प्लॅटफॉर्मवरुन, ट्विटरवरून तो सध्या जी काही धुलाई करतोय, ती तर त्याच्या केवळ चाहत्यांनाच नाही, प्रत्येकालाच पार खुश करून टाकणारी आहे.
भारताचा टॉप स्पिनर आर. अश्विन कालच एका कार्यक्रमात सेहवागबाबत सांगत होता. अश्विन म्हणाला, ‘मी त्यादिवशी नेटमध्ये त्याला बॉलिंग करत होतो. पण बॉल कुठेही टाका, आॅफला, लेगला, मिडल लेंग्थ. चांगला, वाईट.. मी टाकलेल्या प्रत्येक बॉलच्या आणि माझ्या मानसिकतेच्याही तो चिंधड्या उडवत होता. त्याला बॉलिंग करणं म्हणजे समोरच्या बॉलरसाठी कायमच आपला आत्मविश्वास घालवून बसण्यासारखं आणि त्याला डिमॉरलाईज केल्यासारखं असतं. मलाही तो तसंच करत होता. माझ्याही मनात सारखं येत होतं, हा बॅट्समन एकतर काहीच्या काही टॅलेंट असलेला आहे किंवा मी तरी बॉलर म्हणून एकदम कंडम आहे, काही लायकीच नाही आपली..’

 


जगातला कोणताही बॅट्समन याबाबत सेहवागच्या आसपासही नाही. दुसऱ्या क्रमांकावरच्या शेन वॉटसननं पहिल्याच बॉलला आठ वेळा, अ‍ॅडम गिलख्रिस्टनं आठ वेळा आणि बांगला देशचा तमीम इकबाल या ओपनरसं सहा वेळा चेंडू बाऊंडरीच्या बाहेर तडकावला आहे.
त्याच्या तडाख्यातून जगातले भलेभले बॉलरही सुटलेले नाहीत. आपल्या भक्ष्याला फाडून खाणारा सेहवाग ‘वाघ’ आहे ते यामुळेच!..

Web Title: 'Trichakundi' made by the bowler, therefore, Sehwag is 'Wagh'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.