शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी महिलेने दागिने गहाण ठेवून बांधलं शौचालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 16:11 IST

मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील एका महिलेने आपले दागिने गहाण ठेवून शौचालय बांधलं आहे. या महिलेचं नाव अन्नपुर्णा असं आहे. अन्नपुर्णा यांनी फक्त शौचालय बांधलं नाही, तर गावातील इतर कुटुंबांनाही शौचालय बांधण्यासाठी प्रेरणा देत आहेत.

ठळक मुद्देमध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील एका महिलेने आपले दागिने गहाण ठेवून शौचालय बांधलंअन्नपुर्णा यांनी शौचालय बांधण्यासाठी सरकारी निधीचीही वाट पाहिली नाहीअन्नपुर्ण यांच्यापासून प्रेरणा घेत गावातील अन्य कुटुंबांनीही घरात शौचालय बांधण्यास सुरुवात केलीये

भोपाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आव्हानानंतर देशातील अनेक भागांमधून स्वच्छ भारत मोहिमेला पाठिंबा मिळताना दिसत आहे. मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील एका महिलेने आपले दागिने गहाण ठेवून शौचालय बांधलं आहे. या महिलेचं नाव अन्नपुर्णा असं आहे. अन्नपुर्णा यांनी फक्त शौचालय बांधलं नाही, तर गावातील इतर कुटुंबांनाही शौचालय बांधण्यासाठी प्रेरणा देत आहेत. गावाची लोकसंख्या फक्त 630 इतकी आहे. अन्नपुर्णा आपल्या कुटुंबासोबत राहतात. त्यांना चार अपत्य आहेत ज्यामध्ये दोन मुली आणि मुलं आहेत. अन्नपुर्णा यांचा पती मजुरीचं काम करतो. 

अन्नपुर्णा यांनी सांगितलं की, 'मला खुल्यावर शौचाला जायला आवडायचं नाही. त्यामुळेच मी तात्काळपणे शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला'. अन्नपुर्णा यांनी शौचालय बांधण्यासाठी सरकारी निधीचीही वाट पाहिली नाही आणि आपल्या कुटुंबासाठी दागिने गहाण ठेवून शौचालय बांधकामास सुरुवात केली. अन्नपुर्ण यांच्यापासून प्रेरणा घेत गावातील अन्य कुटुंबांनीही घरात शौचालय बांधण्यास सुरुवात केली आहे. याच गावातील 65 वर्षीय कालीबाई यांनी सांगितलं आहे की, मीदेखील माझ्या घरात शौचालय बांधलं आहे, जेणेकरुन आमच्या मुली, सुनेला उघड्यावर जावं लागू नये. 

अन्नपुर्णा आणि कालीबाई यांच्यापासून प्रेरित होत गावातील मीराबाई यांनीदेखील अधिका-यांच्या उपस्थितीत शौचालय बांधकामाला सुरुवात केली आहे. आता गावात एक समितीच नेमण्यात आला आहे. ही समिती सकाळी उठून स्वच्छतेचा संदेश देणार आणि गावातील लोकांकडून उघड्यावर शौचालयाला जाणार नसल्याची शपथ घेणार.

शौचालय नाही 'इज्जत घर' म्हणा, केंद्र सरकारचं सर्व राज्यांना पत्रकेंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधल्या जात असलेल्या शौचालयांचं नाव बदलून 'इज्जत घर' ठेवलं जाऊ शकतं. प्रत्येक राज्य आपापल्या मातृभाषेप्रमाणे हे नाव ठेऊ शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात वाराणसीत दौ-यात शौचालयाचं नाव 'इज्जत घर' ठेवल्याने कौतुक केलं होतं. यानंतर 16 ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र लिहून शौचालयांना 'इज्जत घर' म्हणून संबोधलं पाहिजे असा सल्ला दिला आहे. अनेक भाषांचा वापर होत असणारी राज्ये 'इज्जत घर'शी समांतर दुसरं नाव ठेवू शकतात, असंही पत्रातून सुचवण्यात आलं आहे. 

वाराणसी दौ-यावर पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेव्हा एका शौचालयाचं उद्घाटन केलं होतं. त्यावेळी त्यांनी शौचालयाचं नाव 'इज्जत घर' ठेवल्याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं होतं. पंतप्रधान मोदींनी यावेळी असेही म्हटले होते की, शहंशाहपूरमध्ये शौचालयाची पायाभरणी केली तेथे शौचालयावर इज्जतघर असे नाव देण्यात आले आहे. मला हे फार आवडले. ज्यांना आपल्या इज्जतची चिंता आहे ते नक्कीच इज्जतघर बांधतील.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNarendra Modiनरेंद्र मोदी