शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींनाही हवे स्वतंत्र राज्य, एकवटले चार राज्यांतील कार्यकर्ते!

By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: June 17, 2025 14:16 IST

स्वतंत्र भिल्ल प्रदेश स्थापन करण्यात यावा यासाठी आदिवासी टायगर सेनेच्या चारही राज्यांतील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन देवमोगरा येथे एल्गार पुकारला.

रमाकांत पाटीललोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार: महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांतील आदिवासीबहुल जिल्हे जोडून स्वतंत्र भिल्ल प्रदेश स्थापन करण्यात यावा यासाठी आदिवासी टायगर सेनेच्या चारही राज्यांतील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन देवमोगरा (गुजरात) येथे एल्गार पुकारला आहे. 

आदिवासींसाठी स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. स्वतंत्र भिल्ल प्रदेश निर्मितीसाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांतील कार्यकर्त्यांची एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. पहिली बैठक गुजरातमधील नानीनरोली येथे  झाली होती. त्यानंतर आता आदिवासींचे कुलदैवत असलेल्या याहामोगी मातेच्या देवमोगरा या गावात घेण्यात आली. यावेळी चारही राज्यांतील सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. आता तिसरी बैठक महाराष्ट्रात घेण्याचा निर्णयही यावेळी झाला.

असा हवा भिल्ल प्रदेशमहाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात व राजस्थान या चार राज्यांतील एकूण ४४ जिल्हे जोडून स्वतंत्र भिल्ल प्रदेश स्थापन करण्यात यावा, अशी मागणी आहे. 

-महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगावसह नाशिक, ठाणे आणि पालघर या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे तर मध्य प्रदेशातील इंदूर, गुना, शिवपुरी, मंदसोर, नीमच, रतलाम, धार, देवास, खंडवा, खरगोन, बऱ्हाणपूर, बडवानी, अलिराजपूर. 

-राजस्थानमधील बांसवाडा, डुंगरपूर, बाडमेर, जालोर, सिरोही, उदयपूर, झालावाड, राजसमद, चितोडगड, कोटा, बारा, पाली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

 -गुजरातमधील अरवल्ली, महिसागर, दाहोद, पंचमहल, सुरत, वडोदरा, तापी, नवसारी, छोटा उदयपूर, नर्मदा, साबरकाठा, बनासकांठा, भरूच, वलसाड या जिल्ह्यांचा स्वतंत्र भिल्ल प्रदेशात समावेश व्हावा, अशी मागणी आहे.

भिल्ल प्रदेशची स्थापना व्हावी यासाठी त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींवर दबाव टाकून ही मागणी विधानसभा व संसदेत करावी, गाव पातळीवर आंदोलन उभे करावे. सामाजिक चळवळीच्या माध्यमातून या प्रश्नावर लढा देण्याचा ठराव करण्यात आला आहे, अशी माहिती आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ता अजय गावित यांनी दिली.

टॅग्स :GujaratगुजरातIndiaभारत