शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात: आदिवासी तरुणीचं अपहरण करुन दोन आठवडे बलात्कार; आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 09:10 IST

कठुआ आणि उन्नवनंतर आता गुजरातमध्ये बलात्काराची घटना समोर आली आहे

गुजरात: कठुआ आणि उन्नवमधील बलात्कारामुळे देशातील वातावरण ढवळून निघालं असताना आता गुजरातमध्येही असाच प्रकार घडला आहे. तापी जिल्ह्यातील उच्चल तालुक्यामधील एका १८ वर्षांच्या आदिवासी तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानं खळबळ माजली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणीचं अपहरण करुन तिच्यावर दोन आठवडे बलात्कार करण्यात आला.  पीडित तरुणी शेजारच्या गावातून परतत असताना तिचं अपहरण करण्यात आलं. अपहरण करणारा मनिष वसावा पीडित तरुणीच्याच गावचा रहिवासी आहे. मनिषनं तरुणीला जबरदस्तीनं रिक्षात बसवलं आणि तो तिला सूरतला घेऊन आला. यानंतर त्यानं तिच्यावर एका खोलीत बलात्कार केला. दोन आठवडे मनिष तरुणीवर अत्याचार करत होता. यानंतर बुधवारी पीडितेला तिच्या गावी सोडण्यात आलं. घडलेल्या प्रकाराची वाच्यता न करण्याची धमकी मनिषनं तरुणीला दिली होती. दरम्यान तरुणी घरी न परतल्यानं तिच्या पालकांनी २६ मार्चला पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पीडितेनं घरी पतरल्यावर संपूर्ण प्रकार कुटुंबीयांना सांगितला. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली. 'आम्ही या प्रकरणात पीडितेच्या जबाबावरुन तक्रार दाखल केली आहे. सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध सुरु आहे. बलात्कार करणारा आरोपी विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. या प्रकरणाची आणखी माहिती गोळा करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत,' अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक एन. व्ही. तडवी यांनी दिली. याआधी सूरतमधील ओलपाड तालुक्यात दोन मुलींचं लैंगिक शोषण आणि बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली. यामधील दोघेजण १९ वर्षांचे आहेत, तर एक आरोपी अल्पवयीन आहे. मंगळवारी हा संपूर्ण प्रकार घडला. पीडित मुली शिवण क्लासवरुन परतत असताना वेलूक गावचे रहिवासी असणाऱ्या तिघांनी मुलींना शेतात नेऊन त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तीन आरोपींपैकी एका १९ वर्षांच्या तरुणानं एका मुलीवर बलात्कार केला. तर इतर दोन आरोपींनी एका तरुणीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.  

टॅग्स :Rapeबलात्कार