शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

चाचण्या घटल्या, बाधितांचे प्रमाण घटले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 06:51 IST

महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसांत बाधितांच्या संख्येत १८ टक्के घट नोंदविण्यात आली. ४ मे रोजी महाराष्ट्रात चाचण्यांचे प्रमाण १७ टक्क्यांनी घटले तर ३ मे रोजी ३० टक्क्यांनी घट झाली होती.

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : गेल्या पाच दिवसांत देशात कोरोना चाचण्यांचे प्रमाण २१ टक्क्यांनी घसरले आहे. परिणामी बाधितांच्या संख्येतही घट झाल्याचे चित्र आहे. बाधितांच्या संख्येत घट नोंदवली जात असल्याने देशव्यापी टाळेबंदीचा निर्णय घ्यावा किंवा नाही, या मुद्द्यावरून केंद्र सरकार संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.

दिल्लीत चाचण्यांमध्ये सर्वाधिक घट

महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसांत बाधितांच्या संख्येत १८ टक्के घट नोंदविण्यात आली. ४ मे रोजी महाराष्ट्रात चाचण्यांचे प्रमाण १७ टक्क्यांनी घटले तर ३ मे रोजी ३० टक्क्यांनी घट झाली होती. दिल्लीतही पाच दिवसांत २७ टक्क्यांनी चाचण्या कमी झाल्या आहेत. उत्तर प्रदेश कोरोनास्थिती उत्तमरित्या हाताळत असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीकडेच केले होते. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. उत्तर प्रदेशात २२ टक्क्यांनी रुग्णसंख्या घटली असली तरी चाचण्यांचे प्रमाण १५ टक्क्यांनी घटले असल्याचे निदर्शनास आले आहे.

आकडेवारी नेमकी किती?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून देशात कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसत असले तरी त्यामागे चाचण्यांची घटलेली संख्या हे कारण आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये तर लोकांना कोरोना निगेटिव्ह असल्याचे चुकीचे अहवालही दिले जात आहेत किंवा ते पॉझिटिव्ह असल्याचे तोंडी सांगितले जात आहे. या अनागोंदीमुळे कोरोनाबाधितांची नेमकी आकडेवारी किती, याबाबत संभ्रम आहे.

    देशाचे चित्रn देशात गेल्या पाच दिवसांत चाचण्यांचे प्रमाण २१ टक्क्यांनी घसरले. ३० एप्रिल रोजी देशभरात १९ लाख ५० हजार चाचण्या करण्यात आल्या होत्या. तर ४ मे रोजी हेच प्रमाण १५ लाख ४० हजार एवढे होते. n नेमक्या याच कालावधीत देशातील कोरोनाबाधितांचा आलेख घसरू लागल्याचे आढळले. n चाचण्यांची संख्या घटल्याने रुग्णनोंद घटल्याचे वास्तव मात्र विचारात घेतले गेलेले नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdelhiदिल्ली