शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल गुन्हेगारांसारखी केजरीवालांना वागणूक; चेहराही पाहू दिला नाही; भगवंत मान यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 05:25 IST

अट्टल गुन्हेगारालाही दिली जात नाही अशी वागणूक केजरीवाल यांना तिहार तुरुंगात देण्यात येत असल्याचा आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण प्रकरणात तिहार तुरुंगात अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय अंतरिम दिलासा देण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ईडीला नोटीस बजावून पुढील सुनावणी २९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात ठेवली आहे.

दरम्यान, अट्टल गुन्हेगारालाही दिली जात नाही अशी वागणूक केजरीवाल यांना तिहार तुरुंगात देण्यात येत असल्याचा आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला. अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या पीठासमोर सुनावणीत केजरीवाल यांच्या पदरी निराशाच आली. 

ईडीला नोटीसऐन निवडणूक काळात सूडबुद्धीने ईडीने अटक केली. लवकरात लवकर सुनावणी व्हावी, अशी मागणी ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी केली. त्यावर लवकरात लवकर म्हणजे २९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यातच सुनावणी करता येईल, असे न्यायालयाने स्पष्ट करत न्यायालयाने ईडीला नोटीस बजावून २४ एप्रिलपर्यंत म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले.

भेटीत काय झाले?मान यांनी आज केजरीवाल यांची तिहार तुरुंगात भेट घेतली. केवळ तीस मिनिटे चाललेल्या भेटीत केजरीवाल यांच्याशी काचेपलीकडून फोनवर संवाद साधावा लागला. त्यांचा आपण चेहराही नीट पाहू शकलो नाही, अशी तक्रार मान यांनी केली. एखाद्या अट्टल गुन्हेगारालाही दिली जात नाही अशी वागणूक केजरीवाल यांना तिहार तुरुंगात देण्यात येत असल्याचा आरोप मान यांनी केला. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालBhagwant Mannभगवंत मानAam Admi partyआम आदमी पार्टी