शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

वाचव रे जगन्नाथा... देशातील सर्वात मोठ्या खजिन्याची किल्ली हरवली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 15:55 IST

पुरीतल्या प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या रहस्यमयी खजिन्याची चावी हरवल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. खरं तर मंदिराच्या खजिन्याची चावी कथित स्वरूपात गायब झाली आहे.

भुवनेश्वर- पुरीतल्या प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या रहस्यमयी खजिन्याची चावी हरवल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. खरं तर मंदिराच्या खजिन्याची चावी कथित स्वरूपात गायब झाली आहे. यानंतर पुरीचे शंकराचार्य आणि भाजपानं पटनायक सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जगन्नाथ मंदिरातल्या रहस्यमयी खजिन्याची चावी गायब झाल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. खजिना असलेल्या आंतरिक कक्षाची चावीही गायब झाली आहे.ओडिशा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 4 एप्रिलला 34 वर्षांनंतर एक चौकशी समिती मंदिरात आली होती. तेव्हापासून ही चावी गायब आहे. खजिन्याची चावी श्रीजगन्नाथ मंदिर प्रबंधकाजवळ नाही, तसेच कोषागारालाही या चावीसंदर्भात काहीही माहिती नाही, असंही जगन्नाथ मंदिराच्या प्रबंधन समितीचे सदस्य रामचंद्र दास महापात्रा म्हणाले आहेत.आता या चावीवरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप झडू लागले आहेत. पुरी शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी या प्रकारानंतर ओडिशा सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच भाजपा सरकारनंही या प्रकारानंतर मुख्यमंत्री नवीन पटनायक सरकारकडून स्पष्टीकरण मागवलं आहे.ओडिशाचे भाजपा प्रवक्ते पीतांबर आचार्य म्हणाले, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जगन्नाथ मंदिरातल्या रहस्यमयी खजिन्याची चावी गायब झाल्याबाबत स्पष्टीकरण दिलं पाहिजे. तसेच याला कोण जबाबदार आहे हेसुद्धा सांगावं. जगन्नाथ मंदिर हे पुरीमध्ये स्थित आहे. हिंदूंच्या पवित्र स्थानांपैकी एक आहे. 50 कोटी रुपयांचं वार्षिक उत्पन्न असलेल्या या मंदिराची एकूण मालमत्ता 250 कोटी रुपयांच्या आसपास आहे. या मंदिरातील खजिना लुटण्याचा 12व्या शतकापासून आतापर्यंत 18 वेळा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु अद्यापही कोणालाही हा खजिना लुटण्यात यश आलेलं नाही. जगन्नाथ मंदिरात 7 कक्ष असून, यातील मंदिराचे फक्त 3 द्वार भाविकांसाठी कायम खुले असतात. 

टॅग्स :Odishaओदिशा