शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

रेल्वेमधून विमानासारखा प्रवास! बघा आतून कशी आहे 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 15:15 IST

Vande Bharat Sleeper Train Video : वंदे भारत ट्रेनमधून आता झोपून प्रवास करता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केली असून, ही ट्रेन आतून कशी दिसते, याचाही व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Vande Bharat Sleeper Train News : ताशी १६० किमी इतक्या वेगाने धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करणे आता आणखी आरामदायक बनणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून लवकरच 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन सुरू केली जाणार असून, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत स्लीपर गाडीच्या प्रोटोटाइप मॉडेलचे रविवारी (१ सप्टेंबर) अनावरण केले. प्रवास आरामदायक व्हावा अशा पद्धतीने बर्थ आणि बोगींची रचना केलेली आहे. या गाडीची पहिली झलक व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. (watch vande bharat sleeper train latest Video)

वंदे भारत ट्रेन पाठोपाठ आता वंदे भारत स्लीपर ट्रेनही धावणार आहेत. BEML ने वंदे भारत ट्रेनच्या कोचची बांधणी केली असून, प्रोटोटाइप मॉडेलच्या माध्यमातून या ट्रेनचा पहिला लुक अखेर समोर आला. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्याचे अनावरण केले. ट्रेनच्या आतमधील दृश्य बघितले, तर प्रवाशांना विमान प्रवासाचीच अनुभूती प्रवास करताना येणार आहे. 

कशी आहे वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस?

वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसला एकूण १६ डब्बे असणार आहेत. प्रोटोटाईप मॉडेलमध्ये ११ एससी ३ टिअर कोच, ४ एससी २ टिअर कोच आणि एक एससी फर्स्ट क्लास कोच असणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ट्रेनमध्ये एससी 611 थर्ड एससी सीट्स असणार आहे. तर १८८ सेंकड एससी आणि २४ फर्स्ट क्लास एससी सीट्स असतील. 

भारतीय रेल्वे आणि बीईएमएल यांच्या म्हणण्यांनुसार वंदे भारत स्लीपर ट्रेन जागतिक दर्जाचे बनवण्यात आले आहे. युरोपीय मानकांनुसार ही ट्रेन बनवण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये जीएफआरपी पॅनल, बाहेरचे दरवाजे ऑटोमॅटिक, तर आतील दरवाजे सेन्सर आधारित आहेत. 

वंदे भारत स्लीपर ट्रेनची वैशिष्ट्ये

प्रवास आरामदायक व्हावा, यासाठी ट्रेनमध्ये वाचन करण्यासाठी लाईट आहे. त्याचबरोबर युएसबी चार्जिंग पॉईंट आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष बर्थ आणि टॉयलेटही आहे. उद्घोषणा करण्यासाठी व्यवस्था आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आहे. एससी १ टिअरमध्ये गरम पाणी असणार आहे. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवIndian Railwayभारतीय रेल्वे