शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

पारदर्शक कारभारामुळे माहिती अधिकार कायद्याची यापुढे गरजच भासणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 04:34 IST

नवी दिल्ली : सरकारचे कामकाज पारदर्शकतेने चालावे असाच आमचा प्रयत्न असून, तसे पूर्णपणे शक्य झाल्यास माहितीच्या अधिकार कायद्याचा वापर ...

नवी दिल्ली : सरकारचे कामकाज पारदर्शकतेने चालावे असाच आमचा प्रयत्न असून, तसे पूर्णपणे शक्य झाल्यास माहितीच्या अधिकार कायद्याचा वापर आपोआप कमी होईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी येथे केले.

केंद्रीय माहिती आयोगाच्या १४ व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन गृहमंत्र्यांनी केले. ते म्हणाले की, सरकारने घेतलेले निर्णय असोत की, कोणत्याची सरकारी कार्यालयांतील माहिती असो, ती आपोआप लोकांपर्यंत पोहोचवण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. ती आपोआप लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारच्या प्रत्येक मंत्रालयाचे काम पारदर्शकपणे चालायला हवे.सरकारी कामकाजात ती पारदर्शकता आणायला आम्ही सुरुवात केली आहे. त्यामुळे लोकांना माहितीच्या अधिकाराचा कायदा वापरण्याची गरजच भासणार नाही.

जनता आणि सरकार यांच्यात प्रचंड दरी असल्याने या कायद्याची गरज निर्माण झाली आणि तो २00५ साली करण्यात आला; पण आता ती दरी बुजवण्यासाठी केंद्र सरकारने पावले टाकायला सुरुवात केली आहे. लोकांना आता सरकारविषयी पारदर्शक कारभारामुळेच विश्वास निर्माण झाला आहे. याही पुढे जाऊ न माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा वापर करावाच लागू नये, अशी व्यवस्था आम्ही निर्माण करीत आहोत, असे ते म्हणाले.

सरकारच्या पारदर्शक कारभारामुळे अनियमितता, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार यांना आळा बसू लागला आहे. प्रशासनही आता वेगाने काम करू लागले आहे. त्याचे चांगले परिणाम जनतेला पाहायला मिळत आहेत, असा दावाही गृहमंत्र्यांनी केला.

सरकार स्वत: सर्व माहिती जनतेपर्यंत पोहोचवेनच्कोणत्याही सरकारचे यश माहितीच्या अधिकाराखाली किती अर्ज दाखल होतात, यावर अवलंबून नसते.च्जेव्हा माहिती सहजासहजी मिळेनाशी होते, तेव्हाच लोकांना माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा वापर करावा लागतो, असे सांगून अमित शाहा म्हणाले की, आमचे सरकार स्वत:हूनच सर्व माहिती जनतेपर्यंत पोहोचवेन, या पद्धतीने काम करीत आहे. त्यामुळे आरटीआयखालील अर्ज आपोआप कमी कमी होत जातील.

टॅग्स :Amit Shahअमित शहा