शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अचानक ट्रेनचे डबे इंजिनपासून वेगळे, मध्यरात्री कपलिंग तुटल्याने झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 13:52 IST

कानपूरमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना टळली आहे. मध्यरात्री कपलिंग तुटल्याने गोरखपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या कुशीनगर एक्स्प्रेसचे डबे वेगवेगळे झाले.

कानपूरमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना टळली आहे. मध्यरात्री कपलिंग तुटल्याने गोरखपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या कुशीनगर एक्स्प्रेसचे डबे वेगवेगळे झाले. त्यामुळे सुमारे चार तास ट्रेन पुखरायां स्थानकात उभी होती. नंतर काम करून ट्रेन रवाना करण्यात आली. कपलिंग अंतर्गत ट्रेनचे दोन डबे एकमेकांना जोडले जातात. काल रात्री हे कपलिंग तुटल्याने कुशीनगर एक्स्प्रेसचे काही डबे इंजिनपासून वेगळे झाले.

एका डब्याचे कपलिंग तुटल्याने डब्बे ट्रेनपासून वेगळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या डब्याचे कपलिंग तुटले तो डब्बा काढून दुसरा डबा जोडण्यात आला आणि सुमारे चार तासांनंतर ट्रेन रवाना करण्यात आली. 8 वर्षांपूर्वी याच स्थानकावर (पुखरायां) ट्रेन उलटून भीषण अपघात झाला होता. सुदैवाने यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही.

कुशीनगर एक्स्प्रेस गोरखपूरहून मुंबईला जात होती. त्यानंतर रात्री 3 वाजण्याच्या सुमारास कानपूरच्या पुखरायां स्थानकापूर्वी ही घटना घडली. ट्रेनच्या S-2 कोचचं कपलिंग तुटल्यामुळे तो ट्रेनपासून वेगळा झाला. रेल्वे स्थानकावर पुढचे डबे उभे राहिले तर काही मागचे डबे तिथेच राहिले.

मध्यरात्री एक्स्प्रेसचे दोन भागात विभाजन झाल्याचं पाहून स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये घबराट पसरली. यानंतर इंजिनच्या मागे असलेली ट्रेनही स्टेशनच्या दुसऱ्या ट्रॅकवर आणण्यात आली. त्यानंतर एस-2 कोचमधील प्रवाशांना दुसऱ्या कोचच्या सीटवर बसवून इच्छित स्थळी पाठवण्यात आले.

गोरखपूरहून ट्रेन सुटल्यावर त्याची रीतसर तपासणी केली जाते का, असा प्रश्न उपस्थित होतो. ट्रेन परीक्षक प्रत्येक कोचचे कपलिंग तपासतात. मग वाटेत ट्रेनचे कपलिंग कसे तुटले? हजार किलोमीटरहून अधिक प्रवास करणारी ही एक्स्प्रेस गाडी वेगात असती तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :railwayरेल्वे