शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दु:खद... नामीबीयातून आणलेल्या चित्त्यांपैकी साशा मादीचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 09:46 IST

नामिबियातून भारतात आणलेल्या ८ चित्त्यांपैकी साशा ही मादी चित्ता २२ मार्च रोजी एकदम सुस्त पडल्याचे आढळून आले.

देशात चित्ता संगोपन आणि संरक्षणाची मोहिम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाती घेतली होती. त्यानुसार, गतवर्षी त्यांच्या जन्मदिनी आफ्रिकेतील नामिबिया येथून नर आणि मादी अशा ८ चित्त्यांचे भारतात आगमन झाले होते. मोठ्या जल्लोषात या वन्य जीवांचे स्वागत करण्यात आले, त्यानंतर त्यांना मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. मात्र, या ८ पैकी एक असलेल्या साशा नामक मादी चित्त्याचे २७ मार्च रोजी निधन झाले. साशा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता, तिला किडनीचा त्रास होता हे तपासणीतून समोर आले. 

नामिबियातून भारतात आणलेल्या ८ चित्त्यांपैकी साशा ही मादी चित्ता २२ मार्च रोजी एकदम सुस्त पडल्याचे आढळून आले. त्यानंतर, वन विभागातील मॉनिटरींग टीमने तात्काळ क्वारंटाईन करुन तिची तपासणी केली. त्यावेळी, साशाच्या किडनीत संक्रमण असल्याचे समजले. त्यानंतर, तिच्यावर उपचारही सुरू झाले. मात्र, भारतात आणण्यापूर्वीच साशाला किडनीचा विकार होता, हे तपासात समोर आले. दरम्यान, उपचारादरम्यान साशाचा सोमवारी कुनो येथील नॅशनल पार्कमध्येच मृत्यू झाला. दरम्यान, गतवर्षी आणखी १२ चित्त्यांचा ग्रुप भारतात आणण्यात आला, त्यामध्ये, ७ नर आणि ५ मादा चित्ता आहेत. त्यांनाही कुनो येथील राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात ठेवण्यात आलंय.  

राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात राहतोय चित्ता

गवताळ प्रदेशात राहणारा चित्ता हा बिबट्यासारखा दिसत असला तरी तो बिबट्या पेक्षा चपळ आणि हटके आहे. १९५२ मध्ये शेवटचा चित्ता राजस्थानातून  नष्ट झाल्याचे केंद्र शासनाने घोषीत केले होते. त्यानंतर भारतात चित्ता आणण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. सर्वोच्च न्यायालयाने सन २०२० मध्ये अफ्रिकन चित्ता भारतात आणण्याची परवानगी दिली. दोन वर्षानंतर आफ्रिकन चित्ता मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पामध्ये आणून सोडण्यात आले आहेत. हा प्रकल्प समृद्ध गवताळ प्रदेश असून त्या भागात आफ्रिकन चित्ता वास्तव्य करत आहे. तेथे सोलर कुंपण करुन त्या चित्त्यावर निगराणी ठेवली जात आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीforestजंगल