शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

आपुले मरण पाहिले म्या डोळा; रोप वेवर अडकलेल्या पर्यटकांची आपबीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 13:21 IST

झारखंडमधील रोप वेवर अडकून पडलेल्या पर्यटकांची सुटका करण्यात आली असून, त्यांचे अनुभव ऐकून लोक स्तब्ध होत आहेत. पर्यटक सौरभ यांनी सांगितले की, आम्हाला जगण्याची शाश्वती नव्हती.

एस. पी. सिन्हादेवघर (झारखंड) :

झारखंडमधील रोप वेवर अडकून पडलेल्या पर्यटकांची सुटका करण्यात आली असून, त्यांचे अनुभव ऐकून लोक स्तब्ध होत आहेत. पर्यटक सौरभ यांनी सांगितले की, आम्हाला जगण्याची शाश्वती नव्हती. परंतु संरक्षण दलाने वाचविले. प्रचंड उष्म्यामुळे हैराण होतो. अनेकांचा घसा तर तहानेने कोरडा पडला होता. काहींनी शिवांबू पिऊन आपले प्राण वाचविले.

दुपारी ४.३२ झालेले होते. मी, आई-वडील, सासरे व पुतण्यासह रोप वेमध्ये बसलेलो होतो. मात्र ट्रॉलीवर २४ तास तहान-भुकेने व्याकूळ होऊन काढावे लागले. रात्री भीतीने झोपही आली नाही. प्रचंड उष्मा असल्यामुळे घसा कोरडा पडला होता. परंतु काहीच उपाय नसल्यामुळे बाबा बासुकीनाथ यांचे स्मरण करीत होते, हा थरारक अनुभव सांगताना सौरभ भेदरलेल्या अवस्थेत होता. आपुले मरण पाहिले म्या डोळा, अशी अनेकांची परिस्थिती होती.

अन्य एक पर्यटक नीरजने सांगितले की, रोप वे सुरू होताच झटके बसू लागले. एक मोठा आवाज झाला व ट्रॉली थांबली. पर्वतावर पोहोचताच हवेत ट्रॉली हलू लागली व आम्ही खाली पडणार असे वाटू लागले. आम्ही सर्वात आधी टूरिस्ट बसच्या एजंटशी मोबाईलवर संपर्क साधला. तो पर्वताच्या खाली आमची वाट पाहत होता. त्याला कळाले होते की रोप वेचा रोलर तुटला आहे. सलग २४ तास आम्ही श्वास रोखून जीवन-मरणाच्या सीमारेषेवर बसलो होतो.अन्य ट्रॉलीमध्ये अडकलेले लोक वाचवा-वाचवा म्हणून ओरडत होते. कोणी पाणी-पाणी म्हणत होता. 

रोप-वेवर अडकलेल्या सर्वांची सुटका-    झारखंडमधील त्रिकूट पर्वतावर रोप-वेमध्ये अडकलेल्या सर्व ४६ जणांची तिसऱ्या दिवशी सुटका करण्यात आली. मंगळवारी दुपारी एअरलिफ्ट करताना एक महिला दीड हजार फूट खाली कोसळली. -    तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एनडीआरएफने दिलेल्या माहितीनुसार, बचाव करताना कोसळलेल्या शोभा देवी साह यांचा श्वासोच्छ्वास सुरू आहे. ही महिला देवघरची आहे.-    दरम्यान, सोमवारी मृत पावलेल्या राकेश यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी आक्रोश करून रास्ता रोको केला. 

आई गमावलीगिरिडीहचे रहिवासी गोविंद यांनी सांगितले की, रोप वेबाबत खूप ऐकले होते. याचा आनंद लुटण्यासाठी ट्रॉलीमध्ये चढलो. पर्वतावर फिरून खाली येताना ट्रॉली कशाला तरी धडकली. यात आम्ही सर्वजण जखमी झालो. 

बचाव करताना आई सुमंतीदेवी यांचे निधन झाले. माझ्या पत्नीचा जबडा व पायाला गंभीर जखम झाली. मुलीच्या पायाचे हाड तुटले. दीड वर्षांचा मुलगा आनंद याची तब्येत गंभीर आहे. त्याचा संपूर्ण जबडा तुटला आहे. अशा प्रकारे पर्यटकांनी आपबीती सांगितली.

टॅग्स :Jharkhandझारखंड