शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

26 ला व्यापाऱ्यांचा देशव्यापी बंद, जीएसटीतील त्रुटींचा जाच; ४० हजार संघटना आल्या एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 07:54 IST

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या व्यापारी महासंघाने ‘बंद’ची हाक दिली आहे.

मुंबई : जीएसटी करपद्धतीतील तरतुदींमुळे होणाऱ्या जाचाच्या विरोधात देशभरातील सर्व व्यापारी २६ फेब्रुवारी रोजी आपला व्यवसाय बंद ठेवणार असून, त्यासाठी त्यांच्या ४० हजार संघटना एकत्र आल्या आहेत.  कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या व्यापारी महासंघाने ‘बंद’ची हाक दिली आहे.हा बंद यशस्वी व्हावा, यासाठी आमचे पदाधिकारी देशातील प्रत्येक राज्याचा दौरा करीत असून, तेथील व्यापारी व संघटना यांच्या भेटी घेत आहेत, असे ‘कॅट’चे अध्यक्ष प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले. ते म्हणाले की, या बंदमध्ये व्यापाऱ्यांबरोबरच महिला उद्योजक, कर सल्लागार, लघुउद्योग, कंपनी सेक्रेटरी, पेट्रोल पंपधारक, चित्रपट उद्योग, अन्नप्रक्रिया उद्योग, मोबाइल उद्योग यांतील लोकांनीही सहभागी व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे.याशिवाय ऑनलाइन व्यवसायातील विक्रेते, व्यापारी व संबंधित संघटना यांनाही या बंदमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असे खंडेलवाल म्हणाले. आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी व्यापार बंद यशस्वी व्हावा, यासाठी आताच दौरे सुरू केले असून, १४ ते २३ फेब्रुवारी या काळात प्रत्येक राज्यात, शहरात संघटना व व्यापाऱ्यांच्या सभा घेण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.राज्यातही तयारी सुरूजीएसटीमधील अनेक तरतुदी जाचक असून, त्यांकडे आम्ही वेळोवेळी केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. राज्यातील संघटना बंदमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे राज्यातही हा बंद यशस्वी होईल, असा दावा त्यांनी केला.

टॅग्स :GSTजीएसटी