शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर मोर्चाने शेतकऱ्यांचा मोदी सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 05:20 IST

प्रजासत्ताकदिनी राजपथावर येणार;  आज सरकारशी चर्चा 

नवी दिल्ली : कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता पंजाब, हरियाणा सीमेवरून आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टरवरून कूच केले.  दिल्ली-एनसीआरच्या सीमेवर हजारो शेतकरी ट्रॅक्टरवर बसून आपला निषेध नोंदवत होते. काहीही झाले तरी मागे हटणार नाही, अशा घोषणांनी दिल्लीची सीमा दणाणली होती.

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधातील  निदर्शनाच्या ४३ व्या दिवशीदेखील शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. गाझियाबाद, गुरुग्राम, सोनीपत, हुडा सिटी सेंटरपर्यंत ट्रॅक्टरवरून शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. सरकारने कायदे रद्द केले नाहीत तर प्रजासत्ताकदिनी राजपथावर ट्रॅक्टर दिसतील, असा इशारा आंदोलक संघटनांचे प्रमुख नेते राकेश टिकैत यांनी दिला.

सकाळी अकरा वाजेपासून सिंधू, टिकरी, गाझीपूर, शाहजहांपूर सीमेवरून कुंडली, मानेसर, पलवलच्या दिशेने मोर्चा सुरू झाला. केएमपी एक्स्प्रेस वेवरही ट्रॅक्टर मोर्चा होता.  शेतकरी संघटना व केंद्र सरकारमधील बोलणी फिस्कटल्याने आंदोलन अजूनच तीव्र झाले आहे. दोन्ही बाजूंचे सदस्य आता शुक्रवारी चर्चा करतील.  शेतकरी संघटना आणि सरकारचे प्रतिनिधी यांच्यात यापूर्वी ४ जानेवारी रोजी आठव्या टप्प्यात झालेली चर्चाही निष्फळ ठरली होती. शेतकरी तीनही कृषी कायदे रद्द करण्याच्या आपल्या मागणीवर अडून आहेत, तर सरकारकडून मात्र कायद्यात बदल करण्याची तयारी दर्शवली जातेय. 

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संप