शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी पुन्हा येणार, काँग्रेसचे अध्यक्ष होणार; रिलॉन्चची जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 17:51 IST

राहुल गांधींच्या रिलॉन्चसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देणाऱ्या राहुल गांधींचं रिलॉन्चिंग करण्याची तयारी काँग्रेसनं सुरू केली आहे. राहुल गांधींना रिलॉन्च करण्यासाठी त्यांच्या सल्लागारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचं वृत्त 'इकॉनॉमिक टाईम्स'नं दिलं आहे. राहुल गांधींची प्रतिमा बदलण्यासाठी काँग्रेसची टीम कामाला लागली आहे. याचाच भाग म्हणून राहुल गांधी देशभरात दौरे करणार आहेत. राहुल गांधी सभांच्या माध्यमातून जनतेला संबोधित करणार असून त्यामध्ये ते रोजीरोटी आणि घटनेच्या रक्षणाचा मुद्द्यावर जोर देतील. सध्या देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे. याशिवाय सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी यासारख्या मुद्द्यांवरुन वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी त्यांच्या भाषणातून रोजगार आणि संविधानाचं संरक्षण हे दोन मुद्दे उपस्थित करतील. जूनमध्ये पन्नाशीचे होणारे राहुल गांधी येत्या मंगळवारी राजस्थानात एका जनसभेला संबोधित करणार आहेत. मोदी सरकारच्या काळात वाढलेली बेरोजगारी हा त्यांच्या भाषणाचा मुख्य विषय असेल. 'राहुल गांधींनी पक्षाचं नेतृत्व करावं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. त्यांनी अद्याप यावर भाष्य केलेलं नाही. मात्र त्यांनी याबद्दलचा निर्णय घ्यावा याची आम्ही वाट पाहत आहोत,' असं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितलं. वाढती बेरोजगारी, शेतीच्या समस्या आणि संविधान वाचवण्याची आवश्यकता हे राहुल गांधी यांच्या भाषणाचे प्रमुख मुद्दे उपस्थित असतील, अशी माहिती वेणुगोपाल यांनी दिली. सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी यासारख्या मुद्द्यांवरुन मोदी सरकार देशात दुफळी निर्माण करण्याचं काम करत असून शेतकऱ्यांच्या समस्या, रोजगार, महागाई हे देशापुढील खरे प्रश्न असल्याचं राहुल त्यांच्या भाषणातून जनतेला सांगतील, असंदेखील ते पुढे म्हणाले.उद्या राजस्थानात जनसभा घेतल्यानंतर ३० जानेवारीला राहुल गांधी केरळमध्ये जनसभेला संबोधित करतील. यानंतर ते झारखंडसह काँग्रेशासित राज्याच्या दौऱ्यांना सुरुवात करतील. या दौऱ्यांनंतर राहुल भाजपाशासित राज्यांमध्ये सभा घेतील.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीcongressकाँग्रेस