सुरेश डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात कडाक्याच्या थंडीत काश्मीरच्या सौंदर्यात भर पाडणारे गोठलेले धबधबे पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्र ठरली आहेत.
उत्तर काश्मीरमध्ये प्रसिद्ध पर्यटनस्थळ गुलमर्गपासून जवळ असलेल्या टंगमर्गच्या द्रुंग भागातील गोठलेला धबधबा म्हणजे निसर्गाचा चमत्कारच. तो पाहण्यासाठी पर्यटकांसह हौशी ब्लॉगर्स, कंटेंट रायटर्सची गर्दी. गुलमर्गमध्ये उणे ४, श्रीनगरमध्ये उणे ३.४ तर अमरनाथ यात्रा मार्गावरील शिबिराजवळ पहलगामध्ये पारा शून्याखाली ५ अंशावर आहे.
राजधानी दिल्लीत कडाक्याच्या थंडीसह दाट धुक्याचेही साम्राज्य. दृष्यमानता घटली. हरियाणात थंडीसोबत धुके दाटले, वाहतुकीवर परिणाम, वाहनांची गती मंदावली. उत्तर प्रदेशातही थंडीची लाट, लखनौ-परिसरात तापमान ५ अंशावर.
आठवडाभर हुडहुडी
मध्य भारत, पश्चिमेकडील राज्यांसह महाराष्ट्र ते ओडिशापर्यंत थंडीची लाट या आठवड्यात कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.