शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हार्दिक पटेल यांना अवघड पिच; भाजपने या जागेसाठी दिली उमेदवारी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 10:45 IST

२९ वर्षीय पटेल अहमदाबादच्या विरमगाम तालुक्यातील चंद्रनगर गावचे रहिवासी आहेत. ते विरमगाममध्ये लहानाचे मोठे झाले. त्यांची ही पहिली विधानसभा निवडणूक.

विरमगाम : गुजरातमधील सत्ताधारी भाजपने नुकतेच पक्षात आलेले तरूण पाटीदार नेते हार्दिक पटेल यांना काँग्रेसकडील विरमगाम जागा हिसकावून घेण्यासाठी उमेदवारी दिली आहे. 

२९ वर्षीय पटेल अहमदाबादच्या विरमगाम तालुक्यातील चंद्रनगर गावचे रहिवासी आहेत. ते विरमगाममध्ये लहानाचे मोठे झाले. त्यांची ही पहिली विधानसभा निवडणूक. त्यांची लढत काँग्रेसचे विद्यमान आमदार लखाभाई भारवाड यांच्याशी असेल. भारवाड यांनी २०१७मध्ये भाजपच्या तेजश्री पटेल यांचा पराभव केला होता. यापूर्वी काँग्रेसकडून लढताना तेजश्री विजयी झाल्या होत्या. मात्र भाजपमध्ये जाताच त्यांचा दुसऱ्या निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसला या जागेवर विश्वास आहे. भाजपने पटेल यांना या रिंगणात उतरवले आहे. पण, इतिहास पाहता त्यांना ही निवडणूक अवघड जाऊ शकते. 

जातीय समीकरणे- विरमगाममध्ये ६५,००० ठाकोर (ओबीसी) मतदार, ५०,००० पाटीदार किंवा पटेल मतदार, ३५,००० दलित, २०,००० भारवाड व रबारी समाजाचे मतदार, २०,००० मुस्लीम, १८,००० कोळी समाजाचे सदस्य असे तीन लाख मतदार आहेत. मात्र, या मतदारसंघाने आतापर्यंत वेगवेगळ्या जातींचे उमेदवार निवडून दिले आहेत.

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022hardik patelहार्दिक पटेलBJPभाजपा