शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

बेगुसरायमध्ये कन्हैया कुमारची वाट बिकट, मतविभागणी वाढवणार कटकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 21:52 IST

डाव्या विचारांचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आणि भाजपाचा कडवा हिंदुत्ववादी चेहरा असलेले गिरिराज सिंह हे आमने-सामने येणार असल्याने बिहारमधील बेगुसराय मतदारसंघ देशपातळीवरील राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.

बेगुसराय - डाव्या विचारांचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आणि भाजपाचा कडवा हिंदुत्ववादी चेहरा असलेले गिरिराज सिंह हे आमने-सामने येणार असल्याने बिहारमधील बेगुसराय मतदारसंघ देशपातळीवरील राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. एकेकाळी डाव्या पक्षांचा गड असलेल्या या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली होती. दरम्यान, यावेळच्या निवडणुकीत भाकपला महाआघाडीने जागावाटपात बेगुसराय मतदारसंघ न दिल्याने भाकपने स्वतंत्रपणे कन्हैयाला उमेदवारी दिली आहे. मात्र आरजेडीने तन्वीर हसन यांना मैदानात उतरवल्याने कन्हैया कुमारची वाट बिट झाली आहे. कन्हैया कुमारने केंद्रात सत्ताधारी असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात जोरदार आघाडी उघडली होती. त्यामुळे बिहारमध्ये सत्ताधारी एनडीएविरोधात उभ्या करण्यात आलेल्या महाआघाडीकडून कन्हैया कुमारला बेगुसराय येथून उमेदवारी देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र महाआघाडीत झालेल्या जागावाटपाच्या घोळानंतर बेगुसराय येथून राजद नेते तन्वीर हसन यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे भाकपने कन्हैया कुमार याला स्वतंत्रपणे रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला. मात्र या दोन्ही उमेदवारांमध्ये होणाऱ्या मतविभागणीचा लाभ गिरिराज सिंह यांना मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, कन्हैया कुमार आणि गिरिराज सिंह यांच्यात थेट लढत झाली असती तर त्याचा फायदा कन्हैया कुमार याला झाला असता. मात्र तिरंगी लढतीमुळे मतांचे गणित बिघडणार असल्याचा दावा राजकीय विश्लेषकांकडून करण्यात येत आहे. कन्हैया कुमारवर झालेला देशद्रोहाच्या आरोपामुळे त्याच्याविरोधात प्रखर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून गिरिराज सिंह यांना उरवण्याचा निर्णय भाजपाने घेतला. गिरिराज सिंह हे सुरुवातीला येथून लढण्यास इच्छुक नव्हते. मात्र मनधरणीनंतर त्यांनी बेगुसराय येथून कन्हैया कुमारच्या विरोधात लढण्यास होकार दिला. 2014 मध्ये भाजपाच्या भोला सिंह यांनी आरजेडीच्या तन्वीर हसन यांना 58 हजार मतांनी पराभूत केले होते. भोला सिंह हे सुद्धा पूर्वाश्रमीचे भाकपचे माजी नेते होते. नंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. दरम्यान 2014 मध्ये त्यांना एकूण मतदानाच्या 39.72 टक्के म्हणजे 4 लाख 28 हजार मते मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी तन्वीर हसन यांना 34.31 टक्के म्हणजे 3 लाख 70 हजार मते मिळाली होती. तर भाकपचे उमेदवार राजेंद्र प्रसाद सिंह यांना 17.87 टक्के म्हणजेच दोन लाख मते मिळाली होती.    

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारbegusarai-pcबेगूसरायBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक