शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
3
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
4
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
5
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
6
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
7
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
8
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
9
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
10
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
11
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
12
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
13
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
14
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
15
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
16
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
17
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
18
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
19
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
20
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण

बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 05:54 IST

निवडणूक आयोगाकडून अंतिम यादी प्रसिद्ध; ऑगस्टमध्ये ६५ लाख मतदारांचे स्थलांतर

नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने बिहारमधील मतदारांची अंतिम यादी प्रकाशित केली असून, यात एकूण ७.४२ कोटी मतदारांची नावे आहेत. जून महिन्यात विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) सुरू झाल्यापासूनच्या संख्येत ४७ लाखांपेक्षा जास्त घट झाल्याचे समोर आले आहे. अंतिम यादीतील मतदारांची संख्या मसुदा यादीतील ७.२४ कोटी या संख्येपेक्षा जास्त असल्याचे सर्वेक्षणाअंती दिसत आहे. ऑगस्टमध्ये ६५ लाख मतदारांची नावे स्थलांतर, मृत किंवा गैरहजेरीसह विविध कारणांमुळे वगळण्यात आली होती.बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, १ ऑगस्ट रोजी मसुदा यादी प्रकाशित झाल्यापासून २१.५३ लाख पात्र मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. तथापि, दावे आणि हरकतीच्या टप्प्यात मसुदा यादीतील ३.६६ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली. अंतिम यादी प्रकाशित होईपर्यंत मसुदा यादीतील नावे अपात्र असल्याचे कोणत्या कारणांवरून आढळले, हे मात्र आयोगाने स्पष्ट केलेले नाही. निवडणूक प्रक्रियेच्या कालावधीत पूरक यादी प्रकाशित झाल्यानंतर अंतिम आकड्यांमध्ये होऊ शकतो. थोडासा बदल होऊ शकतो.  

विरोधकांच्या मतचोरीचे पितळ उघडेमुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जदयूचे प्रवक्ते नीरजकुमार यांनी म्हटले आहे की, विरोधकांच्या मतचोरीचे पितळ आता उघडे पडले आहे. अंतिम मतदारयादीत लाखो नवीन नावे समाविष्ट झाली आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश कुमार यांनी वगळलेल्या नावांबाबत चिंता व्यक्त केली. एसआयआरशी संबंधित मुद्दे संपलेले नाहीत. आम्ही शेवटपर्यंत लढू, असे ते म्हणाले.

लवकरच निवडणुकांची घोषणा?बिहार विधानसभा निवडणुकांची लवकरच होईल एसआयआर मोहिमेवरून वाद निर्माण झाला होता. विरोधकांचे म्हणणे होते की, मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने हटवण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. यावरून काही पक्षांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही नेले आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह भाजप नेत्यांनी एसआयआर मोहीम घुसखोरांना बाहेर करण्यासाठी गरजेची आहे. कारण विरोधक त्यांना मताधिकार देऊ इच्छित असल्याचे म्हटले आहे.

पाटणा जिल्ह्यातील स्थितीपाटणा: पाटणा जिल्ह्यातील १४ विधानसभा मतदारसंघांतील एकूण मतदारांची संख्या सुमारे ४८.१५ लाख होती. ही संख्या एक ऑगस्ट रोजी प्रकाशित केलेल्या मसुदा मतदार यादीच्या तुलनेत १.६३ लाखांनी अधिक झाली आहे. जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या २२.७५ लाख होती. दीघा मतदारसंघात सर्वाधिक ४.५६ लाख मतदार आहेत.

टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूक 2024