पाटणा/हाजीपूर: बिहारमधील उच्च शालांत परीक्षा टॉपर्स घोटाळ्यातील सूत्रधार बच्चा रायला, शनिवारी तो आत्मसमर्पणासाठी वैशाली जिल्ह्याच्या भगवानपूर पोलीस ठाण्यात पोहोचला असताना अटक करण्यात आली. बिशुन राय महाविद्यालयाचा सचिव आणि सहप्राचार्य बच्चा रायला अटक करण्यात आली असल्याची माहिती हाजीपूर पोलीस सूत्रांनी दिली. राज्यात बारावीच्या परीक्षेतील कला आणि विज्ञान शाखेचे टॉपर अनुक्रमे रुबी राय आणि सौरभ श्रेष्ठे हे बिशुन राय कॉलेजचेच विद्यार्थी आहेत. या सर्वांची सखोल चौकशी केली जाणार आहे. राष्ट्रीय जनता दलाचा समर्थक समजला जाणारा बच्चा राय पोलिसांना चकमा देण्याचाप्रयत्न करीत होता. वैशालीच्या राघोपूर आणि महुआ मतदारसंघात लालूप्रसाद यांचे पुत्रद्वय तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांच्या विजयसाठी बच्चा रायने कठोर परिश्रम घेतले होते, हे सर्वश्रुत असल्याचा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनी अलीकडेच केला होता. टॉपर्स घोटाळ्यात बच्चा रायने महत्त्वाची भूमिका वठविली होती, याचे संकेत मिळाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यात बच्चा रायची मुलगी शालिनीलाही आरोपी करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)टॉपर्स घोटाळ्यात बच्चा रायने महत्त्वाची भूमिका वठविली होती. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यात बच्चा रायची मुलगी शालिनीलाही आरोपी करण्यात आले आहे.
टॉपर्स घोटाळा; सूत्रधार बच्चा रायला अटक
By admin | Updated: June 12, 2016 03:45 IST