शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

एनडीएमधील एकजूट दाखवण्यासाठी नड्डांच्या घरी जमले बडे नेते, ललन सिंह, चंद्राबाबूही उपस्थित  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 13:38 IST

NDA IMP Meeting: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी एनडीएच्या बड्या नेत्यांची बैठक सुरू झाली असून, या बैठकीला एनडीएमधील मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही उपस्थित आहेत.

मागच्या काही दिवसांपासून देशपातळीवर घडत असलेल्या घडामोडींमुळे भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तडे जातात की काय अशी चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी एनडीएच्या बड्या नेत्यांची बैठक सुरू झाली असून, या बैठकीला एनडीएमधील मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही उपस्थित आहेत.  या बैठतीमध्ये एनडीएतील घटक पक्षांमध्ये उत्तम समन्वय राखण्याच्या दृष्टीने विचार विनिमय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह गृहमंत्री अमित शाह, तेलुगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू, शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधव, जेडीयूचे नेते ललन सिंह, जेडीएसचे नेते एच.डी. कुमारस्वामी, निषाद पार्टीचे संजय निषाद, हम पार्टीचे जीतनराम मांझी, अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांच्यासह एनडीएचे इतर नेते उपस्थित आहेत.

या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी एनडीएमधील मित्र पक्ष असलेल्या भारत धर्मजनसेना पक्षाचे नेते तुषार वेल्लापल्ली हेसुद्धा जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. बैठकीमध्ये सुरुवातीला हरयाणा, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आणि उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत एनडीएला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केलं जाईल. त्यानंतर वन नेशन वन इलेक्शन आणि डॉ. आंबेडकर यांच्या अवमानाचा मुद्दा तसेच इतर मुद्यांवर चर्चा करून एनडीएमधील नेते एका सूरामध्ये आपलं म्हणणं मांडतील.

एनडीएच्या आधीच्या बैठकीमध्ये एनडीएचे सर्व नेते महिन्यातून एकदा बैठक घेतील, असं निश्चित झालं होतं. मात्र हरयाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या व्यस्ततेमुळे ही बैठक होऊ शकली नव्हती.  

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूkumarswamyकुमारस्वामी