शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

Jammu and Kashmir: शोपियांमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरसह दोन दहशतवाद्यांना कंठस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 10:54 IST

Terrorist Killed in Shopian: 10 जुलै रोजी अनंतनागमध्ये लष्करचा म्होरक्या एजाझ ऊर्फ अबू हुरैरासह तीन दहशतवादी ठार झाले होते.

ठळक मुद्देसैन्याने मागील काही दिवसांत लष्कर, हिज्बुल मुजाहिदीन आणि इतर संघटनांच्या अनेक दहशतवाद्यांना ठार केले आहे.

शोपियां: जम्मू-काश्मीरमधील(Jammu-Kashmir) शोपियां(Shopian)मध्ये सुरक्षा दलांनी चकमकीत लष्कर-ए-तोयबा(Lashkar e Toiba) च्या टॉप कमांडरसह दोघांचा खात्मा केला आहे. दक्षिण काश्मीरमध्ये शोपिंया जिल्ह्यात रात्री झालेल्या चकमकीत या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. मृतांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा स्वयंभू कमांडर इश्फाक डार उर्फ अबु अकरम याचाही समावेश होता.

काश्मीर पोलीस प्रमुख (आयजीपी) विजय कुमार म्हणाले की, इश्फाक डार उर्फ अबू अकरम 2017 मध्ये या प्रदेशातील सर्वाधिक सक्रिय दहशतवाद्यांपैकी एक होता. पोलीस, लष्कर आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या माध्यमातून चालवण्यात आलेल्या संयुक्त ऑपरेशनमध्ये त्याला मारण्यात आलं आहे. दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर शोपियांमध्ये सुरक्षा दलांनी संयुक्त ऑपरेशन राबवले. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्या दोघांकडून  AK-47 आणि आठ मॅगझीन जप्त केली आहेत.

यापूर्वी तिघांचा खात्मादरम्यान, यापूर्वी 10 जुलै रोजी अनंतनागमध्ये पाकिस्तानच्या लष्करे तोयबा या संघटनेचा म्होरक्या एजाझ ऊर्फ अबू हुरैरा याच्यासह तीन दहशतवादी चकमकीत ठार झाले होते. जम्मू- काश्‍मीरमधील पुलवामा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. हुरैरा हा श्रीनगर व पुलवामात सक्रिय होता. मारले गेलेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रे व दारूगोळा जप्त करण्यात आला होता. मागीच्या काही दिवसांपासून भारतीय सैन्याला मोठं यश मिळत आहे. सैन्याने मागील काही दिवसांत लष्कर, हिज्बुल मुजाहिदीन आणि इतर संघटनांच्या अनेक दहशतवाद्यांना ठार केले आहे.

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबा