शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

फक्त एक टन अतिरिक्त वजनामुळे फसलं इस्त्रोच्या उपग्रहाचं प्रक्षेपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 15:52 IST

आयआरएनएसएस 1 एच या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात अपयशी ठरल्याने भारताच्या अवकाश कार्यक्रमाला मोठा धक्का बसला.

ठळक मुद्देदोन टप्पे पूर्ण केल्यानंतर पीएसएलव्ही-सी39 ला तिसरा टप्पा पूर्ण करता आला नाही. पीएसएलव्ही-सी39 जी क्षमता आहे त्यापेक्षा एक टन अतिरिक्त वजन प्रक्षेपकामध्ये होते.

नवी दिल्ली, दि. 2 - पीएसएलव्ही-सी39 हा भारताचा भरवशाचा प्रक्षेपक आहे. पण गुरुवारी हाच प्रक्षेपक आयआरएनएसएस 1 एच या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात अपयशी ठरल्याने भारताच्या अवकाश कार्यक्रमाला मोठा धक्का बसला. हे उपग्रह प्रक्षेपण का फसले ? त्यामागे नेमकी काय कारणे आहेत याचा शोध सुरु केल्यानंतर एक टन अतिरिक्त वजनामुळे हे प्रक्षेपण फसल्याचे समोर आले आहे. 

दोन टप्पे पूर्ण केल्यानंतर पीएसएलव्ही-सी39 ला तिसरा टप्पा पूर्ण करता आला नाही. पीएसएलव्ही-सी39 जी क्षमता आहे त्यापेक्षा एक टन अतिरिक्त वजन प्रक्षेपकामध्ये होते. त्यामुळे तिस-या टप्प्यात हिट शील्ड वेगळी झाली नाही. ज्याचा परिणाम गतीवर झाला. उदहारणार्थ अंतिम टप्प्यात प्रतिसेकंद 9.5 किलोमीटरची गती हवी होती. पण ती 8.5 किलोमीटर राहिली असे इस्त्रोच्या उपग्रह केंद्राचे माजी संचालक एस.के. शिवाकुमार यांनी सांगितले. उड्डाणाच्यावेळी प्रक्षेपकामध्ये जी उष्णता तयार होते. त्यापासून उपग्रहाचे संरक्षण करण्यासाठी हीट शील्ड असते. आयआरएनएसएस 1 एच हा आयआरएनएसएस मालिकेतील आठवा उपग्रह होता. यापूर्वी या मालिकेतील सात उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे.

आयआरएनएसएस 1 एच च्या निमित्ताने प्रथमच उपग्रह निर्मितीमध्ये खासगी क्षेत्राला यामध्ये सहभागी करुन घेण्यात आले होते. हा 1425 किलो वजनाचा उपग्रह होता. या उपग्रहाच्या निर्मितीवर 120 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. आयआरएनएसएस 1 एच च्या निमित्ताने 24 वर्षात पहिल्यांदाच पीएसएलव्हीचे उड्डाण अपयशी ठरले. 

लवकरच इस्त्रो रॉकेलला इंधन बनवून करणार उपग्रहाचे प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रो सेमी क्रायोजेनिक इंजिनच्या निर्मितीवर काम करत असून, या इंजिनमध्ये पर्यावरणपूरक रॉकेलचा इंधन म्हणून वापर करण्यावर शास्त्रज्ञ काम करत आहेत. द्रवरुप इंधनापेक्षा रॉकेल हलके असल्यामुळे सामान्य तापमानाला ते साठवून ठेवता येऊ शकते. सध्या उपग्रह प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणा-या रॉकेटच्या इंजिनमध्ये द्रवरुप हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या मिश्रणाचा इंधन म्हणून वापर केला जातो. 

हे इंधन गोठवून टाकणा-या  (-253) डीग्री सेल्सिअस तापमानाला साठवून ठेवावे लागते. जर सर्व काही ठरल्याप्रमाणे जुळून आले तर, इस्त्रो 2021 मध्ये रॉकेलच्या सहाय्याने सेमी क्रायोजेनिक इंजिनची चाचणी करु शकते. पारंपारिक हायड्रोजन, ऑक्सिजन इंधनापेक्षा रॉकेल हलके आहे. क्रायोजेनिक इंजिनाच्या वापरामुळे रॉकेटमधील पेलोडची क्षमता चार ते सहा टनांनी वाढेल. सेमी क्रायोजेनिक इंजिन असलेल्या रॉकेटने अवजड उपग्रह प्रक्षेपित करता येऊ शकतात.