शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी ₹400 कोटींची कमाई; या टोलनाक्याने सरकारची तिजोरी भरली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 22:10 IST

Toll Tax: कोणत्या राज्यात आहे देशातील सर्वाधिक कमाई करणारा टोलनाका? पाहा...

Toll Plaza: भारतात गेल्या काही वर्षांपासून महामार्गाचे जाळे वेगाने पसरत आहे. पण, याच हायवे-एक्स्प्रेस-वेवरुन प्रवास करताना प्रत्येकाला टोल प्लाझावर थांबून टोल टॅक्स भरावा लागतो. टोल टॅक्समुळे तुमचा खिसा कापला जात असला तरी, सरकारी तिजोरी भरते. या टोल टॅक्समुळे सरकारी तिजोरीत प्रचंड पैसा येतो. पण तुम्हाला माहीत आहे का, देशातील सर्वात कमाई करणारा टोल प्लाझा कोणता आहे आणि त्याची कमाई इतकी आहे? 

देशातील सर्वात फायदेशीर टोल प्लाझादेशातील सर्वाधिक कमाई करणारा टोल प्लाझा गुजरातच्या भरठाणा गावात आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर बांधलेला हा टोल प्लाझा कमाईच्या बाबतीत अव्वल आहे. राजधानी दिल्लीला मुंबईशी जोडणाऱ्या या महामार्गावर बनवण्यात आलेला हा टोल प्लाझा सर्वाधिक कमाई करणारा टोल प्लाझा म्हणून गणला जातो.

एका वर्षात किती उत्पन्नगुजरातमधील NH-48 च्या वडोदरा-भरूच भागावरील भरठाणा टोल प्लाझा हा देशातील सर्वात फायदेशीर टोल प्लाझा आहे. या टोल प्लाझाने वर्षाला 400 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये, म्हणजे 2019-20 ते 2023-24 या काळात या टोल प्लाझाने 2,043.81 कोटी रुपयांचा टोल वसूल केला आहे.

टोल प्लाझाची कमाई वाढलीफास्टॅग लागू झाल्यापासून टोल प्लाझाची कमाई वाढली आहे. फास्टॅगच्या मदतीने टोल टॅक्स चोरी कमी झाली आहे. यामुळे महसूलदेखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सरकारसाठी रोड टॅक्स हे कमाईचे मोठे साधन आहे. उत्तर भारतातील राज्यांमधून माल NH-48 द्वारे पश्चिम किनारपट्टीच्या बंदरांवर पोहोचतो. ट्रक आणि वाहनांना या टोलनाक्यावरून जावे लागते, त्यामुळे या टोलनाक्याचे उत्पन्न अधिक असते, तर खासगी वाहनांच्या तुलनेत व्यावसायिक वाहनांचा टोलही अधिक असतो.

याच HH-48 वर बांधलेला राजस्थानचा शाहजहांपूर टोल प्लाझा कमाईच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे दरवर्षी 378 कोटी रुपये टोलवसुली होते. याशिवाय पश्चिम बंगालचा जलधुलागोरी टोल प्लाझा कमाईत तिसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात बराजोर टोल प्लाझा चौथ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 97 टोलनाके आहेत.

टॅग्स :tollplazaटोलनाकाGujaratगुजरातhighwayमहामार्ग