शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Tokyo Olympics: ऑलिंपिकविजेता मीराबाई बनली 'करोडपती', स्पेशल सरकारी पोस्टही मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 09:51 IST

Tokyo Olympics: मीराबाईने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत देशाला पहिलं पदक मिळवून देत भारताचं खातं उघडलं आहे. वेटलिफ्टींग प्रकारा रौप्यपदक जिंकून मीराबाईने इतिहास घडवला.

ठळक मुद्देमाळरानावर लाकडं गोळा करुन डोक्यावर मोळी बांधणारी मीरा ते ऑलिंपिक रौप्यपदक विजेता मीराबाई चानू हा तिचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यामुळेच, गल्लीपासून दिल्लीपर्यंत तिच्या यशाचं सेलिब्रेशन होत आहे.

नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची सुरुवात दमदार झाली आहे. पहिल्याच दिवशी भारताच्या महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं ४९ किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदकाची कमाई करुन दिली. पदकाची मानकरी होताच मीराबाईनं गेल्या पाच वर्षांपासून बाळगलेलं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. मीराबाईच्या या यशानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत तिचं कौतुक होत आहे. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मणीपूरचे मुख्यमंत्री ए.बीरेन सिंग यांनी मीराबाईशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तिचं अभिनंदन व कौतुक केलं. 

मीराबाईने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत देशाला पहिलं पदक मिळवून देत भारताचं खातं उघडलं आहे. वेटलिफ्टींग प्रकारा रौप्यपदक जिंकून मीराबाईने इतिहास घडवला. माळरानावर लाकडं गोळा करुन डोक्यावर मोळी बांधणारी मीरा ते ऑलिंपिक रौप्यपदक विजेता मीराबाई चानू हा तिचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यामुळेच, गल्लीपासून दिल्लीपर्यंत तिच्या यशाचं सेलिब्रेशन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मीराबाईचं कौतुक करत अभिनंदन केलं आहे. विशेष म्हणजे मणीपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंग यांनी मीराबाईला 1 कोटी रुपयांचं बक्षीस देणार असून तिच्यासाठी सरकारी नोकरीतही स्पेशल पोस्ट देणार असल्याची घोषणा केली. 

सिंग यांनी मीराबाईचं कौतुक करण्यासाठी तिच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. दोघांमधील हा संवाद त्यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे. या संवादात त्यांनी मीराबाईचं कौतुक करत, देशाला आणि मणीपूरला तुझा अभिमान असल्याचं म्हटलं. ज्यावेळी, तू मेडल जिंकलं, त्यावेळी मी देशाचे गृहमंत्री अमित शहांसोबतच बैठकीत होतो. विशेष म्हणजे गृहमंत्री शहा यांनीच या बैठकीत तात्काळ माईक पकडून ही आनंदाची घोषणा केली आणि सर्वांनी उभे राहून तुझ्या विजयाचं अभिनंदन केल्याचंही बीरेन यांनी मीराबाईला सांगितलं. माराबाई आणि बीरेन यांच्यातील आनंदाच हा संवाद सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.  

आयओएकडून 40 लाखांचं बक्षीस

मीराबाई चानू मूळची मणिपूरची आहे आणि येथील सरकारनं गेल्याच महिन्यात आपल्या राज्यातील पदक विजेत्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पारितोषिकाची घोषणा केली होती. राज्यांसोबतच भारतीय ऑलिम्पिक संघानंही (आयओए) पदक विजेत्या खेळाडूंसाठी पारितोषिकं जाहीर केली आहेत. आयओएकडून केल्या गेलेल्या घोषणेनुसार सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना ७५ लाख, रौप्य पदक विजेत्या खेळाडूंना ४० लाख आणि कांस्य पदक विजेत्या खळाडूंना २५ लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. त्यानुसार मीराबाई चानू हिला आयओएकडून ४० लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. 

राज्य सरकारकडून 1 कोटीचं बक्षीस

मणिपूर सरकारनं आपल्या राज्यातील पदक विजेत्या खेळाडूंना देखील पारितोषिकाची घोषणा केली होती. त्यानुसार सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला १.२० कोटी आणि रौप्य पदक विजेत्या खेळाडूंना १ कोटी रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. त्यानुसार मीराबाई चानू हिला मणिपूर सरकारकडून १ कोटी रुपायांचं पारितोषिक मिळणार आहे. म्हणजेच ऑलिम्पिकच्या रौप्य पदकासह मीराबाई चानू हिला आता एकूण १ कोटी ४० लाख रुपायंचं पारितोषिक देखील मिळणार आहे. यासोबत इतर काही विभागातूनही मीराबाई हिला पारितोषिकांची घोषणा केली जाऊ शकते.  

टॅग्स :Mirabai Chanuमीराबाई चानूOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Chief Ministerमुख्यमंत्री