शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांपासून एकत्र, मात्र विवाहाला मान्यता नाही! फैसला आता सुप्रीम कोर्टाच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 10:26 IST

आता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयातील या संदर्भातील सर्व याचिका एकत्र करून त्यावर सुनावणीचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : भारतीय कायद्यानुसार विवाह फक्त स्त्री आणि पुरुष यांच्यातच होऊ शकतो; परंतु कायद्यातील पत्नीची व्याख्या तिचे लिंग निर्दिष्ट करत नाही. ‘पत्नी’ हा शब्द जेंडर न्यूट्रल मानण्याच्या मागणीला मान्यता मिळाल्यास समलैंगिकांमधील विवाहाला कायदेशीर मान्यता मिळू शकते. याच आशेवर दशकापासून एकत्र राहणारी पुरुष जोडपी आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयातील या संदर्भातील सर्व याचिका एकत्र करून त्यावर सुनावणीचा निर्णय घेतला आहे.

पार्थ-उदयचे १७ वर्षांचे सहजीवन- दुसरी याचिका पार्थ फिरोज मेहरोत्रा आणि उदय राज यांची आहे, जे १७ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.  त्यांचा दावा आहे की, ते दोन मुलांना एकत्र वाढवत आहेत; परंतु त्यांचे लग्न कायदेशीररीत्या पूर्ण झालेले नाही. त्यामुळे कायदेशीररीत्या त्यांच्या मुलांचे पालक म्हणता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

१० वर्षांपासून एकत्रसमलिंगी विवाहाला मान्यता द्यावी यासाठी एक याचिका पश्चिम बंगालचे सुप्रियो चक्रवर्ती आणि दिल्लीचे अभय डांग यांनी दाखल केली आहे. ते दोघे १० वर्षांपासून एकत्र राहत आहेत.

ऑनलाइन सुनावणीसर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्यावर विविध राज्यांतील उच्च न्यायालयांमधील प्रलंबित याचिका स्वत:कडे वर्ग केल्या आहेत. यासोबतच मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड व न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना ऑनलाइन सुनावणीला उपस्थित राहण्याची परवानगी दिली. सुप्रीम कोर्टात १३ मार्चला या मुद्द्यावर सुनावणी होणार आहे.

काय होईल?- कायद्यातील पत्नीची व्याख्या तिचे लिंग निर्दिष्ट करत नाही, असा दावा होतो. - ‘पत्नी’ हा शब्द जेंडर न्यूट्रल मानण्याच्या मागणीला मान्यता मिळाल्यास समलैंगिकांमधील विवाहाला कायदेशीर मान्यता मिळेल; शिवाय  मालमत्ता हक्क, मूल दत्तक घेण्याचा अधिकार अशा कायदेशीर प्रश्नांवरील शंका दूर होतील.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय