शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूतील राजकीय उलथापालथ थांबली; अण्णाद्रमुकचे पलानीसामी आणि पन्नीरसेल्वम गट एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 15:58 IST

तामिळनाडूतील अण्णाद्रमुकचे पलानीसामी आणि पन्नीरसेल्वम हे दोन्ही गट एकत्र आले आहेत. काल अण्णा द्रमुकच्या दोन गटांचे विलीनीकरण करण्यावर सहमती झाली होती

चेन्नई, दि. 21 : तामिळनाडूतील अण्णाद्रमुकचे पलानीसामी आणि पन्नीरसेल्वम हे दोन्ही गट एकत्र आले आहेत. काल अण्णा द्रमुकच्या दोन गटांचे विलीनीकरण करण्यावर सहमती झाली होती, आज त्याची फक्त औपचारिक घोषणा करण्यात आली. पन्नीरसेल्वम पक्षाचे निमंत्रक तर ई. पलानीसामी सहनिमंत्रक असतील अशी माहिती समोर आली आहे. 

शशिकला आणि कुटुंबीयांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, ओ. पन्नीरसेल्वम यांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आज दुपारी साडेचार वाजता ते मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.  ओ. पनीरसेल्वम यांच्याकडे सुकाणू समितीचे अध्यक्षपद दिले जाऊ शकते. त्यामुळे त्यांच्याकडे पक्षांतर्गत अधिकार येतील. या तडजोडीनुसार, पलानीस्वामी यांच्याकडे सरकारची, तर पनीरसेल्वम यांच्याकडे पक्षाची धुरा असणार आहे.

पनीरसेल्वम यांच्या गटाने असा आग्रह केला आहे की, शशिकला यांच्या हकालपट्टीच्या प्रस्तावावर सर्व पदाधिका-यांनी स्वाक्ष-या कराव्यात. लोकसभेचे उपाध्यक्ष एम. थंबीदुराई यांनी टीटीव्ही दिनकरन यांना उपमहासचिव पदावरून हटविण्याच्या १० आॅगस्ट रोजीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली नव्हती. या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास नकार देणारे थंबीदुराई यांच्याकडे प्रचार सचिव आणि पक्षाचे खासदार नवनीत कृष्णन व विजिया सत्यानंद यांच्याकडे अनुक्रमे वकील शाखा व महिला शाखेची जबाबदारी देण्यात येईल.

या संदर्भात एक सहा सदस्यीय टीम तयार केल्यानंतर, पनीरसेल्वम यांनी शनिवारीच स्पष्ट केले होते की, आम्ही लवकरच एक चांगली बातमी देणार आहोत. अर्थात, पक्षाचे दोन पानांचे चिन्ह मिळण्यात आता टीटीव्ही दिनकरन हे कायदेशीर अडथळा आणू शकतात. 2019 च्या निवडणुकीसाठी भाजपासाठी ही जमेची बाब आहे. कारण अण्णा द्रमुकचे हे दोन गट विलीनीकरणानंतर एनडीएसोबत जाऊ शकतात. तूर्तास मुख्यमंत्रिपद मिळाले नाही, तरी पनीरसेल्वम यांची महासचिवपद मिळण्याची इच्छा आहे.