शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या सभेसाठी ४० हजार ओळखपत्रे, ‘रामलीला’वर आज रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 04:40 IST

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची रामलीला मैदानावर उद्या, रविवार, २९ रोजी रॅली होत असून यासाठी दिल्ली काँग्रेसने बार कोड असलेली ४० हजार ओळखपत्रे जारी केली आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची रामलीला मैदानावर उद्या, रविवार, २९ रोजी रॅली होत असून यासाठी दिल्ली काँग्रेसने बार कोड असलेली ४० हजार ओळखपत्रे जारी केली आहेत.या रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांची नेमकी संख्या जाणून घेणे हा यामागील हेतू आहे. काही नेते सभेतील गर्दीचा आकडा अतिरंजित सांगतात. पण या ओळखपत्रांमुळे उपस्थित कार्यकर्त्यांची नेमकी संख्या समजणार आहे.त्यातून मिळणाऱ्या माहितीतून पक्षाच्या कार्यकर्त्यांचा वॉर्ड, ब्लॉक आणि विधानसभा मतदारसंघ यांचा डेटाबेस तयार करण्यासही मदत होणार आहे. याचा उपयोग प्रत्येक वेळी रॅलीसाठी होणार आहे. ही तयारी दोन आठवड्यांपूर्वीच सुरू करण्यात आली. दिल्ली काँग्रेसकडूून होणारे हे शक्तिप्रदर्शनच आहे.जिल्हा तसेच ब्लॉक स्तरावर नेतृत्व करणाºया प्रत्येक नेत्याने आपल्या भागातील कार्यकर्त्यांसाठी ही ओळखपत्रे घ्यायची आहेत. एखाद्या नेत्याने आपल्या भागातील कार्यकर्र्त्यांसाठी १००० ओळखपत्रे घेतल्यास तशी नोंद केली जाईल. त्यानंतर त्या नेत्याच्या भागातून प्रत्यक्ष किती कार्यकर्ते आले, याची तपासणी करता येईल.काँग्रेसच्या आयटी विभागाचे प्रमुख अनिरुद्ध शर्मा यांनी सांगितले की, रामलीला मैदानाच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या गेटवर चार जण असतील. त्यांच्याकडे कॉम्युटर, बार कोड स्कॅनर असेल. प्रवेश करणाºया कार्यकर्त्यांना या माध्यमातून ट्रॅक करता येईल. काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी असा दावा केला आहे की, पक्ष प्रथमच आपल्या कार्यकर्त्यांसाठी ओळखपत्र देत आहे. कार्यकर्त्यांचे रेकॉर्ड ठेवण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस