शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नरोदा पाटिया दंगल प्रकरणात आज निर्णय, माया कोडनानी, बाबू बजरंगीसह 32 दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 10:20 IST

2002मधलं बहुचर्चित नरोदा पाटिया दंगलप्रकरणी गुजरात उच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे. या प्रकरणात विशेष न्यायालयानं भाजपा आमदार माया कोडनानी आणि बाबू बजरंगीसह 32 जणांना दोषी ठरवलं आहे.

अहमदबाद- 2002मधलं बहुचर्चित नरोदा पाटिया दंगलप्रकरणी गुजरात उच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे. या प्रकरणात विशेष न्यायालयानं भाजपा आमदार माया कोडनानी आणि बाबू बजरंगीसह 32 जणांना दोषी ठरवलं आहे. याच प्रकरणावर गुजरात उच्च न्यायालय आज सुनावणी होणार आहे. 16 वर्षांपूर्वी 28 फेब्रुवारी 2002मध्ये अहमदबादेतल्या नरोदा पाटिया भागात सर्वात मोठी दंगल उसळली होती. 27 फेब्रुवारी 2002ला गोध्रामध्ये साबरमती एक्स्प्रेसच्या बोगी जाळल्यानंतर दुस-या दिवशी गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत नरोदा पाटिया भागात मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला होता. गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीत नरोदा पाटिया येथे 97 लोकांची हत्या करण्यात आली होती. त्यात 33 लोक जखमी झाले होते.गुजरातमधल्या दंगलीचा सर्वाधिक फटका हा नरोदा पाटिया भागाला बसला होता. 2002मध्ये गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय दंगलींमध्येही नरोदा पाटिया येथील दंगल विशेष गाजली होती. या दंगलीत 97 जणांना ठार करण्यात आलं होतं. माया कोडनानी यांना या प्रकरणात 28 वर्षांची शिक्षा झाली होती. दंगल उसळली त्या वेळी माया कोडनानी गुजरात सरकारमध्ये महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री होत्या. त्या या दंगलीच्या सूत्रधार होत्या, असा ठपका न्यायालयाने ठेवला होता.नरोदा गावात झालेल्या दंगलीतील सहभागाबद्दल विशेष कोर्टात खटला सुरू होता, बचाव साक्षीदार म्हणून अमित शहा यांचं नाव आलं होतं. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना माया कोडनानी मंत्री होत्या. नरोदा येथे जेव्हा दंगल झाली, तेव्हा आपण अमित शहा यांच्यासमवेत रुग्णालयात गेलो होतो, त्यामुळे आपला दंगलीत सहभाग नाही, असा दावा माया कोडनानी यांनी कोर्टात केला होता.

टॅग्स :Gujarat Riots 2002गुजरात दंगल 2002