पालकमंत्र्यांच्या हस्ते आज ध्वजारोहण
By admin | Updated: August 14, 2015 23:35 IST
नाशिक : देशाच्या ६८ व्या स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिकरोडच्या विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी (दि़ १५) सकाळी सव्वानऊ वाजता होणार आहे़ या कार्यक्रमानंतर अपर आयुक्तांकडील अपील कामकाज दर्शकप्रणाली अर्थात प्रतिसादचे उद्घाटन होणार आहे़ या कार्यक्रमास विभागीय आयुक्त एकनाथ डौले, अपर आयुक्त आऱजी़कुलकर्णी, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलीस आयुक्त एस़जगन्नाथन आदिंसह सरकारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत़
पालकमंत्र्यांच्या हस्ते आज ध्वजारोहण
नाशिक : देशाच्या ६८ व्या स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिकरोडच्या विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी (दि़ १५) सकाळी सव्वानऊ वाजता होणार आहे़ या कार्यक्रमानंतर अपर आयुक्तांकडील अपील कामकाज दर्शकप्रणाली अर्थात प्रतिसादचे उद्घाटन होणार आहे़ या कार्यक्रमास विभागीय आयुक्त एकनाथ डौले, अपर आयुक्त आऱजी़कुलकर्णी, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलीस आयुक्त एस़जगन्नाथन आदिंसह सरकारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत़१५ ऑगस्टला शहरात दहशतवादी कारवाई तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठी संपूर्ण शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ शहरातील मंदिरे, साधुग्राम, तपोवन, जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, महापालिका आदि ठिकाणची बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून पाहणी करण्यात आली आहे़ महापालिकेत महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यावेळी सुमारे १४ कर्मचार्यांचा सत्कार करण्यात येणार आहे़(प्रतिनिधी)