शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

शपथविधी आज, खातेवाटप नंतर

By admin | Updated: May 26, 2014 02:02 IST

मोदी मंत्रिमंडळातील नावे व खातेवाटपाची उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच प्रत्यक्षात सोमवारी फक्त शपथविधी होईल आणि खातेवाटप पुढील दोन दिवसांत ठरेल,

जयशंकर गुप्त, नवी दिल्ली - मोदी मंत्रिमंडळातील नावे व खातेवाटपाची उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच प्रत्यक्षात सोमवारी फक्त शपथविधी होईल आणि खातेवाटप पुढील दोन दिवसांत ठरेल, असे रात्री उशिरा स्पष्ट झाले. यापूर्वीही अनेकदा अशा पद्धतीने आधी शपथविधी आणि नंतर खातेवाटप असे घडले आहे. मोदी मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहीर होण्यास त्यामुळे आणखी दोन दिवस लागणार असले तरी काही महत्त्वाच्या खात्यांबाबत निश्चित निर्णय झालेला आहे. त्यानुसार भाजपाचे विद्यमान अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याकडे गृह, तर नितीन गडकरी यांच्याकडे वाहतूक आणि पायाभूत सुविधांशी संबंधित एक जम्बो खाते, सुषमा स्वराज यांना संरक्षण तर, अरुण जेटली यांच्याकडे अर्थ खाते सोपविले जाणार आहे. नरेंद्र मोदी परराष्ट्र मंत्रालय स्वत:कडे ठेवण्याची दाट शक्यता आहे. राजनाथसिंह (गृह), नितीन गडकरी (भूपृष्ठ वाहतूक), सुषमा स्वराज (संरक्षण), अरुण जेटली (अर्थ किंवा विदेश), व्यंकय्या नायडू (रेल्वे), स्मृती इराणी (मााहिती आणि प्रसारण राज्यमंत्री - स्वतंत्र प्रभार) असे खातेवाटप राहील. व्यंकय्या नायडू, रवीशंकर प्रसाद, पीयूष गोयल, भाजपाचा अल्पसंख्यक चेहरा मुख्तार अब्बास नकवी, दार्जिलिंगमधून विजयी झालेले सुरेंद्रजितसिंह अहलुवालिया यांचीही वर्णी लागू शकते. आडवाणी यांच्यासह मुरली मनोहर जोशी यांनीही मार्गदर्शकाची भूमिका बजावावी असे मोदींना वाटते. गोपीनाथ मुंडे यांच्यावर केंद्रात जबाबदारी द्यायची की राज्यात, या संभ्रमात पक्ष असताना गडकरी यांनी टोकाची भूमिका घेत मुंडे नसतील तर मीही नाही, अशा भाषेत मुंडे यांच्यासाठी आग्रह धरला, असे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानविरोधी भूमिकेला मुरड घालत नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. पक्षाच्या सर्व खासदारांना सोहळ्यास उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या असून पक्षप्रमुख उध्दव ठाकरेही नवी दिल्लीकडे रवाना होणार आहेत. अरुण शौरी हे अर्थमंत्री बनणार म्हणून चर्चेत आले. त्यानंतर त्यांनी टीव्ही वाहिन्यांना मुलाखती देण्याचा सपाटाच लावला. आता जेटलींकडे हे खाते आल्यामुळे शौरींना हात चोळण्यावाचून पर्याय उरला नाही. शौरींकडे विशेष जबाबदारी असलेल्या आयोगाचे काम सोपवले जाऊ शकते. राजनाथ यांच्याकडे अंतर्गत सुरक्षा सांभाळण्यासाठी अजित डोवाल हे खास अधिकारी असतील. पंतप्रधानांचे राष्टÑीय सुरक्षा सल्लागार हे महत्त्वाचे पद डोवाल यांच्याकडे असेल.