शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमध्ये राडा, ममता बॅनर्जींच्याविरोधात भाजपा कार्यकर्ते आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 14:54 IST

आक्रमक झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे येथील तणाव वाढला आहे.  

कोलकाताः लोकसभा निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार थांबण्याची चिन्हे दिसत नाही. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील वाद विकोपाला पेटला आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत तिघांचा मृत्यू झाला आहे. यावरुन तृणमूल काँग्रेस तसेच भाजपा यांनी एकमेकांवर आरोप करत आहेत.

दरम्यान, आज तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनादरम्यान जय श्री राम अशा घोषणा दिल्या. तसेच, यावेळी आक्रमक झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे येथील तणाव वाढला आहे.  

तृणमूल-भाजपा यांच्यातील संघर्ष चिघळला, तीन दिवसांत चार हत्यापश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस व भाजपामध्ये सुरू असलेला हिंसक संघर्ष निवळण्याची लक्षणे नसून उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील कांकिनारा येथे सोमवारी रात्री गावठी बॉम्बच्या हल्ल्यात दोन जण ठार व तीन जण जखमी झाले. ते दोघे आमचे कार्यकर्ते असून, त्यांना भाजपाच्या गुंडांनी ठार मारल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांत हिंसाचारामध्ये ठार झालेल्या दहा जणांच्या वारसदारांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची भरपाई देण्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे.

बंगालचा गुजरात करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु : ममता बॅनर्जीपश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रपती शासन लागू करण्याची तयारी केंद्रात सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. त्यातच आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला असून,  बंगालचा गुजरात करण्यासाठी  भाजपकडून प्रयत्न होत असल्याचे आरोप ममतांनी केले आहे. राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेल्या भेटीवर त्या आपली प्रतिकिया देतांना बोलत होत्या. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाtmcठाणे महापालिकाMamata Banerjeeममता बॅनर्जी