शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 16:36 IST

Tirupati Laddu controversy : याप्रकरणी टीटीडीने अधिकृतपणे तक्रार दाखल केली आहे. 

Tirupati Laddu controversy: तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचे उघडकीस आले. मागील राज्य सरकारच्या कार्यकाळात तिरुमला तिरुपती देवस्थानमतर्फे (टीटीडी)  प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडू बनविण्यासाठी निकृष्ट पदार्थ व प्राण्याच्या चरबीचा वापर सुरू केला होता, असा अहवाल गुजरातमधील एका प्रयोगशाळेनं दिला. याबाबत आता राजकारण चांगलेच तापलं आहे. दरम्यान, आता याप्रकरणी टीटीडीने अधिकृतपणे तक्रार दाखल केली आहे. 

टीटीडीचे महाव्यवस्थापक पी मुरली कृष्णा यांनी एआर डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेड, दिंडीगुल विरुद्ध पूर्व पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी, सरकारने पोलीस अधिकारी उत्तम त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली एक एसआयटी स्थापन केली आहे. जी लाडू भेसळ प्रकरणाची चौकशी करेल. याचबरोबर, एक दिवस आधी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने (FSSAI) तामिळनाडू येथील आर डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेडला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तिरुमला मंदिराचा प्रसाद बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपाच्या चार नमुन्यांमध्ये प्राण्यांची चरबी आढळून आल्याचा आरोप आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने एआर डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेडला नोटीस पाठवली असून खाद्य सुरक्षा आणि मानक (फूड प्रोडक्ट्स स्टँडर्ड्स अँड फूड ॲडिटीव्ह) नियमन २०११ च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीचा केंद्रीय परवाना का निलंबित केला जाऊ नये, अशी विचारणा केली आहे. केंद्रीय प्रयोगशाळेत तुपाच्या नमुन्यांचे विश्लेषण करताना ते मानकांशी जुळत नसल्याचे प्राधिकरणने म्हटले आहे. दरम्यान, टीटीडीच्या तूप खरेदी समितीने पुरवठा केलेले सर्व नमुने गुजरातमधील आणंद येथील एनडीडीबी कॅल्फ लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणला असे आढळले की तूप मानकांची पूर्तता करत नाही.

मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानंतर वाद आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी अलीकडेच दावा केला होता की, मागील वायएसआरसीपी सरकारच्या काळात तिरुपती मंदिरात लाडू बनवण्यासाठी निकृष्ट पदार्थ व प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला होता. तसेच, या दाव्यांची चौकशी करण्यासाठी एन. चंद्राबाबू नायडू यांनी विशेष तपास पथकाची घोषणा केली आहे. दरम्यान, या लाडूच्या वादानंतर आता सोमवारी (२३ सप्टेंबर) तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण करण्यात आले. या पूजेवेळी मंत्रोच्चाराद्वारे भगवान व्यंकटेश्वर स्वामींची क्षमा मागण्यात आली. टीटीडीने या महाशांती होममचे आयोजन केले होते.  

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटAndhra Pradeshआंध्र प्रदेशChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू