मुंबई : राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पत्नी सपना मुनगंटीवार यांची तिरुपती तिरूमला (बालाजी) संस्थानच्या विश्वस्तपदी निवड करण्यात आली आहे. मुनगंटीवार दाम्पत्य हे तिरुपती बालाजीचे भक्त आहेत.राज्यातील सत्तांतरानंतर मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांनी एका उद्योजकाच्या हेलिकॉप्टरमधून तिरुपतीची वारी केली होती. त्यावरून बरेच वादंग झाले होते. आंध्रचे मुख्यमंत्री हे तिरुपती देवस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. सदस्य निवडीचा अधिकार त्यांनाच असतो. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू सध्या भाजपावर नाराज असताना त्यांनी भाजपा मंत्र्यांच्या पत्नीला देवस्थानवर सदस्य म्हणून घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
तिरुपती संस्थान विश्वस्तपदी सपना मुनगंटीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 04:24 IST