शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 16:39 IST

Prakash Raj Tauts DCM Pawan Kalyan Over Tirumala Tirupati Laddu Controversy: तिरुमला तिरुपती लाडू प्रसाद वादावर प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना सल्ला दिला आहे.

Prakash Raj Tauts DCM Pawan Kalyan Over Tirumala Tirupati Laddu Controversy: तिरुमला तिरुपती व्यंकटेश्वर बालाजी मंदिरात मिळणाऱ्या लाडू प्रसादावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तिरूमला तिरूपती देवस्थानातील लाडू प्रकरणात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आंध्र प्रदेश सरकारकडे अहवाल मागितला असून, मंदिरातील लाडू प्रसादाची तपासणी करण्यात येणार आहे. या वादात आता दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी उडी घेतली असून, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना एक मोलाचा सल्ला देत, खोचक टोला लगावला आहे. 

काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण

देवस्थानकडून लाडू बनविण्यासाठी ३२० रुपये किलो दराने तूप खरेदी केली जात होती. जुलै महिन्यात प्रयोगशाळेतील तपासणीत या तुपात काही बाह्य घटकांची चरबी वापरल्याचे उघडकीस आले होते. स्वस्त, भेसळयुक्त तुपाचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणानंतर आता मंदिराच्या परिसराचे शुद्धीकरण करण्यात येत असल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी दिली. याबाबत उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी भूमिका स्पष्ट केली होती. त्यावरून आता प्रकाश राज यांनी कान टोचले आहेत.

तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

काय म्हणाले होते उपमुख्यमंत्री पवन कल्याण?

गेल्या सरकारच्या कार्यकाळात तिरुपती बालाजी प्रसादमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या निष्कर्षांमुळे आम्ही सर्वजण खूप व्यथित झालो आहोत. संपूर्ण भारतातील मंदिरांशी संबंधित सर्व समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्म संरक्षण मंडळ’ स्थापन करण्याची वेळ आली आहे. माझा विश्वास आहे की, ‘सनातन धर्माचा’ कोणत्याही स्वरूपात होणारा अपमान थांबवण्यासाठी आपण सर्वांनी त्वरित एकत्र आले पाहिजे. प्रसादाचा दर्जा नेहमीच चांगला असतो. थोडासा प्रसाद मिळाला तरी तो प्रत्येकासाठी महाप्रसादासारखा असतो. हे अत्यंत श्रद्धेने केले जाते, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी दिली होती. 

तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता

प्रकाश राज यांनी सल्ला देताना लगावला खोचक टोला

पवन कल्याण यांनी एक्सवर केलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एक सल्ला दिला आहे. तसेच खोचक टोला लगावला आहे. प्रिय मित्रा, तू ज्या राज्याचा उपमुख्यमंत्री आहेस, त्या राज्यात ही घटना घडली आहे. कृपया तू चौकशी लावावी. या घटनेमागे दोषी कोण आहेत, ते शोधून काढावे आणि त्यांना कठोर शिक्षा करावी. पण हा विषय राष्ट्रीय पातळीवर तापवण्यात काय अर्थ आहे. आधीच देशात धार्मिक तणाव कमी आहे का… (याबद्दल तुझ्या दिल्लीतील मित्रांचे आभार), अशी पोस्ट प्रकाश राज यांनी केली आहे. 

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटPrakash Rajप्रकाश राजpawan kalyanपवन कल्याणAndhra Pradeshआंध्र प्रदेश