शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 18:10 IST

"आपल्याला केवळ जागृक होणेच आवश्यक नाही, तर अशा लोकांना फासावर लटकवायला हवे."

तिरुमला तुरुपती मंदिरातील लाडूच्या प्रसादावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात जगतगुरु शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांनीही संताप व्यक्त केला आहे. "हा सनातन धर्माच्या अस्मितासोबत बलात्कार आहे. अशा गैरकृत्यांसाठी, जे जगनमोहन रेड्डी आहेत, जे ख्रिश्चनिकरणासाठी काम करतात, जे राहुल गांधी, सोनिया गांधीं आणि गांधी कुटुंबापासून प्रभावित आहेत, ज्यांनी सैदैव ख्रिश्चनिकरणासाठी काम केले आहे, युपीए सरकारच्या काळात ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी काय-काय उपक्रम केले गेले नाहीत, आपल्याला केवळ जागृक होणेच आवश्यक नाही, तर अशा लोकांना फासावर लटकवायला हवे," असे प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांनी म्हटले आहे. ते एबीपी न्यूजसोबत बोलत होते. 

शंकराचार्य म्हणाले, "प्रसाद केवळ आहार नाही. धार्मिक आस्थेसोबत खेळले गेले आहे. हिंदू धर्मींयांच्या भावनेशी खेळले गेले आहे. हा सनातन धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही. हा सनातन धर्माच्या अस्मितेसोबत बलात्कार आहे."

जगन मोहन रेड्डींवर हल्ला - यावेळी, आंध्रचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी ख्रिश्चन धर्मासाठी काम करतात, असा आरोप शंकराचाऱ्यांनी केला आहे. शंकराचार्य म्हणाले, "अशा गैरकृत्यांसाठी, जे जगनमोहन रेड्डी आहेत, जे ख्रिश्चनिकरणासाठी काम करतात, जे राहुल गांधी, सोनिया गांधीं आणि गांधी कुटुंबापासून प्रभावित आहेत, ज्यांनी सैदैव ख्रिश्चनिकरणासाठी काम केले आहे, युपीए सरकारच्या काळात ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी काय-काय उपक्रम केले गेले नाहीत, आपल्याला केवळ जागृक होणेच आवश्यक नाही, तर अशा लोकांना फासावर लटकवायला हवे. मंदिरांना सरकारी यंत्रनेतून मुक्त करण्याची वेळ आली आहे. यासाठी भाला उचलावा लागला तरी उचलायला हवा. सनातन धर्माच्या रक्षणासाठी अराजकतावादी होण्याची वेळ आली, तर तसे व्हायरला हवे."

सनातन बोर्ड तयार करायला हवे- शंकराचार्य म्हणाले, "सनातन बोर्ड तयार करायला हवे आणि सर्व मंदिरे सनातन बोर्ड अन्तर्गत आणायला हवीत. सरकारला मंदिरांपासून दूर ठेवायला हवे. प्रसादात अशा पद्धतीची भेसळ केवळ शडयंत्रच नाही तर एक गुन्हा आहे. कोट्यवधी लोकांच्या आस्थेसोत खेळ आहे. जगन मोहन रेड्डी सह अशा लोकांना जनतेच्या हवाली करायला हवे आणि सनातन धर्म त्यांना शिक्षा देईल. मंदिराचे शुद्धीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे.  कर्मचारी, अधिकारी, पुजारी सर्वांना वेगळे करून मंदिराचे शुद्धीकरण करायला हवे. सनातन धर्म रक्षण बोर्डाची तत्काळ स्थापना करायला हवी. वेद प्रणीत धर्म मानणाऱ्यालाच मंदिराचे संचालन करण्याचा अधिकार आहे." 

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटAndhra Pradeshआंध्र प्रदेश