शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

टाइम्स नाऊ-व्हीएमआर EXIT POLL- गुजरातमध्ये मोदी लाट कायम, 108 जागांसह बहुमत मिळण्याचा अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 18:42 IST

गुजरात- विधानसभा निवडणुकीसाठीच्या दुस-या टप्प्याचं मतदान संपल्यानंतर आता एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे.

गुजरात- विधानसभा निवडणुकीसाठीच्या दुस-या टप्प्याचं मतदान संपल्यानंतर आता एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. टाइम्स नाऊ-व्हीएमआर यांनी संयुक्तरीत्या घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गुजरातमध्ये 89 जागांसाठी 9 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यासाठी मतदान झालं होतं. तर उर्वरित 93 जागांसाठी दुस-या टप्प्यातील मतदान आज संपन्न झालंय. या एक्झिट पोलमध्ये भाजपाला 182 जागांपैकी 109 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेसला 70 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. तर इतरांना 3 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.टाइम्स नाऊ-व्हीएमआरनं सोशल मीडियाच्या आधारे हा एक्झिट पोल घेतला आहे. मतदारांनी टॅबलेटच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीनं प्रश्न विचारण्यात आले आहेत. सर्व निवडणूक सर्वेक्षण करणा-यांवर जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे. त्याप्रमाणेच मतदारांनी दिलेली ऑनलाइन उत्तर रेकॉर्ड केली जात आहेत. गुजरात विधानसभा ताब्यात घेण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसनं या दोन्ही पक्षांनी सर्व ताकद पणाला लावली आहे.भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी जोरदार प्रचार केला आहे. गुजरात विधानसभा निवडणूक ही दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. गुजरातमध्ये भाजपा 22 वर्षं सत्तेत आहे. तर काँग्रेसला 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याची स्वप्ने पडू लागली आहेत.  

गुजरातमध्ये 2012च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 182पैकी 115 जागा मिळवण्यात यश आलं होतं. त्यातील 6 जागा कमी होऊन भाजपाला 109 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर काँग्रेसकडे 2012च्या निवडणुकीत 61 जागा होत्या. या जागांमध्ये 9 जागांची भर पडून काँग्रेसला 61 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 2012च्या निवडणुकीत मिळलेल्या 6 जागांपैकी 3 जागांवरच समाधान मानावं लागणार आहे.  

 

टॅग्स :GujaratगुजरातGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी